नांदेड| नांदेड जिल्ह्यातील 8 उपविभागांतर्गत कार्यरत 16 तालुक्यातील पोलीस पाटील पदाची भरती करण्यासाठी 1 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने https://nanded.gov.in व https://nanded.applygov.net या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस पाटील पदासाठी भरावयाच्या पदांची संख्या उपविभाग निहाय पुढीलप्रमाणे आहे. यात नांदेड उपविभागात 88, भोकर 82, कंधार 170, हदगाव 101, देगलूर 143, धर्माबाद 64, बिलोली 97 तर किनवट उपविभागात 40 पदे असून एकुण पदासंख्या 785 एवढी आहे.

या पदाच्या भरतीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि. 1 ते सोमवार 8 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार आहेत. मंगळवार 9 जानेवारी रोजी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बुधवार 10 ते शनिवार 13 जानेवारी कालावधीत उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करून घ्यावे लागतील. तर या पदासाठी रविवार 14 जानेवारी 2024 रोजी लेखी परीक्षा नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.

या परिक्षेत प्रत्येक प्रश्नास एक एकुण याप्रमाणे 80 गुणांची राहील. परिक्षेचा अवधी दोन तासांचा असेल. रविवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत उत्तरपत्रिकेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचा nandedrdc@gmail.com या ईमेलवर आक्षेप सादर करता येतील. सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version