नांदेड। महाराष्ट्रातील जालना आणि उस्मानपूर दरम्यान रेल्वे विद्युतीकरण पूर्ण 53.4 किलोमीटर अंतराचा हा विभाग मनमाड – मुदखेड – ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाचा भाग आहे. यासह, मनमाड-उस्मानपूर दरम्यानचा 227 किलोमीटर अंतराचा अखंड विभाग आता विद्युतीकृत झाला आहे.
भारतीय रेल्वेचे मिशन विद्युतीकरण पुढे नेत, दक्षिण मध्य रेल्वेने आता नांदेड विभागातील जालना – उस्मानपूर दरम्यान 53.4 किलोमीटर चे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. मनमाड – मुदखेड – ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून या विभागाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यासह मनमाड-उस्मानपूर दरम्यान 228 किलोमीटर अंतरासाठी विद्युतीकरण विभाग उपलब्ध आहे.
आता, जालना-उस्मानपूर दरम्यान 53 किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने या विभागात एकूण 227 किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. उस्मानपूर – परभणी – मुदखेड – धर्माबाद दरम्यानच्या उर्वरित विभागांमध्ये नजीकच्या भविष्यात विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून कामे वेगाने सुरू आहेत.
रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण ट्रॅक्शन पॉवरमधील बदल टाळून आणि कोचिंग आणि मालवाहू गाड्यांच्या मार्गातील खोळंबा कमी करून गाड्यांची अखंड हालचाल प्रदान करण्यात मदत करते. यामुळे गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होते आणि त्यामुळे विभागीय क्षमता वाढल्यामुळे या विभागांमध्ये अधिक गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. हे शून्य कार्बन उत्सर्जनासह गाड्यांना उर्जा देण्याचे पर्यावरण-अनुकूल साधन देखील प्रदान करते, त्याच वेळी इंधनाच्या खर्चात बचत करते.
श्री अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी विद्युत विभाग आणि नांदेड विभागाच्या अधिका-यांनी वेळापत्रकानुसार विद्युतीकरणाचे काम हाती घेतल्याबद्दल आणि त्यानुसार पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. नांदेड विभागातील उर्वरित ठिकाणची विद्युतीकरणाची कामेही चांगल्या प्रकारे सुरू असून मिशन विद्युतीकरणाचा भाग म्हणून काही महिन्यांत ती पूर्ण केली जातील, असे त्यांनी नमूद केले.