मुंबई। मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते काल.आज.उद्या. प्रकाश मारावार यांच्या कार्य अहवाल पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाला.

गेल्या 35 वर्षापासून प्रकाश मारावार शिवसेनेत काम करत असताना शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवास लाभला त्यांच्या आशीर्वादाने सामाजिक काम करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटनेत सदैव तत्पर. तर युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचे कणखर विचार आत्मसात करत प्रकाश मारावार यांनी गद्दारीच्या काळात विरोधकांना ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देत संघटनेत व सामाजिक कार्यात केलेल्या कार्याचे “काल. आज. उद्या.” या पुस्तकाचे मातोश्री येथे प्रसन्न वातावरणात प्रकाशन संपन्न झाला.

यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत साहेब. खा. अनिल देसाई साहेब. मिलिंद नार्वेकर साहेब. शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद भाई सावंत. चंद्रकांत खैरे साहेब. रवींद्र जी म्हात्रे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील “काल. आज.उद्या.”या कार्या अहवाल पुस्तकाचे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यामुळे शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी समाधान व्यक्त केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version