मुंबई। चॅनलवर बंदी आणून सरकार माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे.. लोकशाही न्यूज चॅनलवरील बंदीची कारवाई निंदनीय आणि संतापजनक आहे.. 13 जानेवारी रोजी माहूर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात सर्व पत्रकार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या या कारवाईचा निषेध करतील अशी माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली आहे..

लोकशाही न्यूज चॅनलवर सरकारने आज अचानक एक महिन्यासाठी बंदी घातली आहे.. यापुर्वी देखील सरकारकडून असा “प्रयोग” झाला होता.. व्यवस्था विरोधी भूमिका घेणारया लोकशाहीवर बंदी आणून सरकार माध्यमांचा आवाज तर बंद करीत आहेच त्याचबरोबर माध्यमांवर दहशत निर्माण करून अंकुश ठेवण्याचा ही प्रयत्न करीत आहे.. सरकारची ही कारवाई कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही.

मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषदेसह विविध पत्रकार संघटनांनी याचा निषेध केला आहेच.. मात्र एवढ्यावरच न थांबता मराठी पत्रकार परिषदेच्या माहूर मेळाव्यास येणारा प्रत्येक पत्रकार काळ्या फिती लावून या ठोकशाहीचा निषेध करेल.. असे एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांनी स्पष्ट केले आहे..

दरम्यान आज नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी आणि जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लोकशाहीवरील कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी केली..

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version