श्रीक्षेत्र माळेगाव| माळेगाव यात्रेत लावणी महोत्सव घेणारी नांदेड जिल्हा परिषद राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे. रसिकांना भूरळ घालणारी व कलावंतांचा मान-सन्मान करणाऱ्या या लावणी महोत्सवासाठी जिल्हा नियोजन समिती मधून एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव येथे आयोजित लावणी महोत्सवाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी मंचावर प्रवीण साले, परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशकुमार मुक्कावार, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, विजय बेतीवार, गट विकास अधिकारी अडेराघो, माजी सभापती आनंदराव पाटील, सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने प्रवीण साले यांनी भूमिका मांडली. यात्रेत लावणी महोत्सव भरवणारी पहिलीच जिल्हा परिषद आहे.

खासदार प्रतापराव चिखलीकरांमुळेच यात्रा व लावणी महोत्सवाला वैभव मिळाले आहे. आता ते शासनाच्या निधीतून महोत्सवाला एक कोटीचा निधी देणार असल्याने ते म्हणाले. प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. तर हनुमंत धुळगंडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी नटराजाचे पूजन व दीपप्रज्वलनाने महोत्सवाची सुरवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवराचा घोंगडी व काठी देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परशुराम कौशल्ये यांनी केले. यावेळी रोहित पाटील, नरेंद्र गायकवाड, केशव मुकदम, दत्ता वाले, भगवानराव राठोड, सचिन पाटील चिखलीकर, अनिल बोरगावकर, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, उप शिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर, बालाजी नागमवाड, विस्तार अधिकारी डी. आय. गायकवाड, धनंजय देशपांडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version