छत्रपती संभाजीनगर| विभागीय आयुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष मधुकरराजे अर्डड यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक २२ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समूळ निर्मुलन करण्यासाठी शासन, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक ०४ जानेवारी, 2011 अन्वये विभागीय स्तरावरील भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आली आहे. विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणा-या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी समितीकडून ऐकून घेण्यात येतात तसेच लेखी स्वरूपातील तक्रारी स्विकारण्यात येतात. विशिष्ट अभिकथनाबाबत स्वतंत्र्यपणे स्थानिक चौकशी करण्याच्या दृष्टीने तजवीजही करण्यात येते.

विभागीय आयुक्त विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष आहेत. पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, विशेष पोलीस महानिरिक्षक, छत्रपती संभाजीनगर, विशेष पोलीस महानिरिक्षक, नांदेड, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड, मुख्य वनसंरक्षक वनवृत्त छत्रपती संभाजीनगर, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर, विभागीय कृषि सहसंचालक छत्रपती संभाजीनगर, विभागीय कृषि सहसंचालक लातूर, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर, उपायुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, छत्रपती संभाजीनगर आदी विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शासकीय सदस्य आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version