नांदेड| धन धन श्री तेगबहादर जी महाराज शिखांचे नववे गुरु यांच्या शहीदी गुरुपुरब दिनांक 17/12/2023 ला श्रद्धा आणि प्रेमाने साजरा करण्यात आला. धन श्री गुरु तेगबहादर महाराज यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी देश आणि मानवतेसाठी आपले शीश बलिदान दिले.

दिल्ली चांदनी चौक येथे आजही गुरुद्वारा शीश गंज साहेब सुशोभित आहे. या निमित्त श्री सुखमणी साहेब जिचे पाठ व कथेचे आयोजन हजुरी साधसंगत व गुरु का खालसा संस्थेचे वतीने स्थानिक गुरुद्वारामध्ये करण्यात आले. हा कार्यक्रम जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे साहेब तसेच गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक थान सिंग यांच्या सहकार्याने पार पडला.

“गुरु का खालचा संस्थेचे “
(अध्यक्ष) कश्मीर सिंघ भट्टी वतीने पाच दिवस रोज रात्री तारीख 13 से 17 तक २०२३ 7: 30 ते 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाला ज्ञानी सरबजीत सिंग जी निर्मले आणि ग्यानी मनजीत सिंग जी गुरुद्वारा लंगर साहिब यांनी पाच दिवस कथा केली या निमित लंगर प्रसादाचे ही वाटप करण्यात आले. यावेळी हजुरी साध संगत तसेच कश्मीर सिंघ भट्टी, जसबीर सिंघ चड्डा, राजेंद्र सिंघ सिद्धू, प्रीतम सिंघ हरियाणा, हरभजन सिंघ भट्टी, बलजीत सिंघ, राम सिंघ रामगडीया अनेकजण उपस्थित होते.

 

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version