नांदेड। जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे टिमला आदेश दिले होते.

दिनांक 04/04/2024 रोजी स्थागूशा चे पोउपनि / दशरथ आडे यांना गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सम्राटनगर, सिडको, नांदेड येथे एक इसम असुन त्यांचेकडे अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे 1) बालाजी दत्तराम कोकणे वय 26 वर्ष व्यवसाय मेकॅनिक रा. सम्राटनगर, सिडको यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष अंगझडती घेतली.

त्याचे कमरेला एक अग्नीशस्त्र (गावठी कटा) व 01 जिवंत काडतुस असा एकुण किंमती 25,600/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला असुन त्यास मिळुन आलेल्या पिस्टल बाबत विचारपुस केली असता, सदर पिस्टल त्याचा मित्र मनिष जाधव रा. लोहा याचे असल्याचे सांगीतले आहे. नमुद आरोपीतांविरुध्द पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. मिळुन आलेल्या आरोपीस पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / दशरथ आडे, पोना / बंडु कलंदर, पो कॉ/राजीव बोधगीरे, इसराईल शेख, साहेबराव कदम, अनिल बिरादार, अकबर पठाण यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version