हदगाव, शे. चांदपाशा। हदगाव शहरातील पोलिस स्टेशनच्या बाजुलाच असलेल्या जि.प. कन्या शाळेतुन शालेय विद्यार्थ्यांनी करिता आलेला सुमारे 70 हजाराच्या शालेय पोषण अहार चोरुन नेल्याची घटना घडलेली असुन या बाबतीत पोलिसांनी नेहमी प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे या बाबतीत माञ अध्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही सदर घटना दि. 22ते 23नोव्हेबर च्या दरम्यान घडल्याची माहीती मिळाली.

या बाबतीत मिळालेली माहीती अशी की शहरात पोलिस स्टेशनच्या जवळच जि.प. प्रा.कन्या शाळा. असुन या परिसरात नेहमी रेलचेल असते सदर शाळा गजबजलेल्या भागात आहे दिपावळी निमित्तानं शाळेला सुट्या असल्या मुळे सध्या शाळा बंद आहे याचाच नेमका फायदा चोरट्यांनी उचलला आहे शाळेमध्ये असलेल्या शालेय पोषण अहार मध्ये तांदुळ 17 किव्टल .चना 1 किव्टल. वटणा 1 कि. 50 किलो मुग दाळ 1किव्टल 50 किलो खाद्यतेल 47 किलो जेवणाच्या प्लेट 150. आदी चोरट्यांनी चोरलेले आहे.

या बाबतीत शाळेच्या प्रमुखांनी पोलिसात फिर्याद दिलेली आहे या बाबतीत हदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे माञ अध्याप ही कोणत्याही संशयीतला पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही विशेष म्हणजे सदर घटना ही गजबजलेल्या भागात घडलेली असुन पोलिस स्टेशनच्या बाजुलाच घडल्याने माञ पोलिसांनी या बाबतीत काहीच चाहुल ही लागू नये या बाबतीत माञ पोलिसांच्या कार्यशैलीवर माञ आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांची मान्य पदा पेक्षा पोलासांची संख्या कमी वरिष्ठ पोलिस आधिका-याच हव तितके लक्ष दिसुन येत नाही.

पोलिस व नागरिकांचे समन्वय नसणे या पुर्वी जिल्हा पोलिस अधिक्षक किवा उपविभागीय पोलिस आधिकारी शहरातील व परिसरातील विविध राजकीय पक्षाचे नेते नागरिक सामाजिक कार्यकर्ते पञकार यांचेशी ‘समन्वय ‘असायचे या मुळे गंभीर गुन्हे सुद्धा उघडकीला येत होते परंतु मागील काही वर्षापासुन अशी परिस्थिती दिसुन येत नाही जर कोणी पोलिसाच्या वरिष्ठ अधिका-याला स्थानिक नागरिक पञकारानी भेटण्याची इच्छा व्यक्त केली तर वरिष्ठ अधिकारी काही तरी कारण सांगुन भेट नाकारतात ही वस्तुस्थिती आहे यामुळे नागरिक व पोलिसाच ‘समन्वय ‘ असने अवश्यक आहे अस चर्चिल्या जात आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version