नायगाव, रामप्रसाद चन्नावार। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मुखेडचा रिपाइं आठवले गटाचा मेळावा आटोपून नरसी मार्गे हैदराबाद जात असताना नरसीच्या चौकात भाजपाचे माजी जि.प. सदस्य माणिक लोहगावे. धम्मदीप भद्रे कांडाळकर व सहकाऱ्यांनी ना. आठवले यांचे जोरदार स्वागत केले. रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दि. १६ रोजी मुखेडला पक्षाच्या मेळाव्यासाठी आले होते. नरसीत जाताना त्यांचा जंगी सत्कार करण्याचे नियोजन करुन कार्यकर्ते वाट पाहत बसले परंतु ना. आठवले हे कहाळामार्गे मुखेडला गेले.

त्यामुळे अनेक जण नाराज झाले होते. हे कळाल्यावर खा. रामदास आठवले यांनी मुखेडचा दौरा आटोपून हैदराबाद जाताना नरसी मार्गे ताफा वळविला. धम्मदीप भद्रे कांडाळकर आणि अनेक कार्यकर्त्यांनी खा. आठवले यांचा जंगी सत्कार केला. रिपाइं कार्यकर्त्यांनी नरसी चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी नरसीचे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर, जाफर, सुभाष पेरकेवाड, डॉ. संतोष उच्चेकर, अजीम शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जोंधळे, मिलिंद बच्छाव, नरसी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ताफ्यात आठवले साहेबांचे पिए मा हेमंत रनपिसे सर, मा पोपटशेट घनवट महाराष्ट्र अध्यक्ष व्यापारी आघाडी, मा सचिन वाघमारे महाराष्ट्र प्रदेश सचिव व्यापारी आघाडी, मा वैजनाथ पाटील मुगावकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व्यापारी आघाडी याचे आठवले  यांच्या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version