नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नरसी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडीच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर यांच्या नेतृत्वाखाली/दि 19/02/2024/ रोजी नरसी चौक येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोहळ्यानिमित्त, छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीधर जगताप, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक परगेवार, पत्रकार मनोहर तेलंग, गोविंद टोकलवाड. नरसीकर, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे, सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे, डाॅ.संतोष मोरे, डाॅ.ज्ञानेश्वर जाधव,डाॅ.धुप्पेकर, पञकार आनंदराव सुर्यवंशी, परमेश्वर जाधव, गणेश कंदुरके, धम्मदिप भद्रे, चंद्रकांत पाटील पवार,गजानन पाटील काडांळकर रामदास पाटील भाकरे, ता अध्यक्ष गंगाधर गायकवाड, पत्रकार किरण वाघमारे, सदस्य हानमत भेदे, प्रदिप जोंधळे, आदी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version