नांदेड। गेल्या काही वर्षांपासून ठप्प झालेली नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी राष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून नांदेड- पुणे- नांदेड विमानसेवा सुरू होणार आहे. २३ मार्चपासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार व रविवारी दुपारी ४.४० वाजता नांदेड विमानतळावरून विमान उड्डाण घेणार असून, पुणे विमानतळावर ५.३० वाजता उतरणार आहे.

तसेच पुणे विमानतळावरून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार व रविवारी सायंकाळी ६ वाजता पुणे विमानतळावरून नांदेडसाठी उड्डाण घेणार आहे. ते नांदेड विमानतळावर ६.५० वाजता उतरेल. या विमानसेवेमुळे प्रवाशांना चांगली सोय उपलब्ध

नांदेड – दिल्ली – अमृतसर- मुंबई- नांदेड अशी सेवा चंडीगड हैदराबाद अपेक्षित आहे.. नांदेड- पुणे ची मागणी नसताना हि सेवा सुरु होत आहे तरी पण नसल्यापेक्षा छान, स्टार एअर सेवेचे स्वागत आहे. पुणे येथून विमान सेवा सुरु झाल्यास पंजाब दिल्लीहून नांदेडला येण्यासाठी दिल्ली- पुणे आणि पुणे- नांदेड असा सहप्रवास करावा लागेल. नांदेडचा सचखंड गुरुद्वारा देश विदेशात प्रसिद्ध असल्याने विमानाला पुरेसे प्रवासी नियमीत उपलब्ध होऊ शकतात. विमान सेवा सुरु राहिल्यास नांदेडचे नाव जगभर होत राहिल, आर्थिक

मागील तीन वर्षापासून नांदेडची विमानसेवा बंद आहे. त्यामुळे नांदेडकरांसह देश- विदेशातील शीख भाविकांना दर्शनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच मुंबई, पुणे, हैदराबाद अशी कोणतीच सेवा नसल्याने सर्वांनाच मोठा त्रास होत आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने

विमान प्राधिकरण व केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करण्यात आले. गुरुद्वाराला येणाऱ्या भाविकांची मुख्य मागणी लक्षात घेता बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग यांनी स्वतः यात लक्ष घालून केंद्रीय उड्डयन मंत्री आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. यात केंद्र सरकारने मार्चमध्ये श्री हुजूर साहेब नांदेडसाठी विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

या विमानसेवेमुळे नांदेड- पुणे कनेक्टिव्हिटी चांगली झाल्याने आता नांदेडकरांना व परिसरातील प्रवाशांना रेल्वे किंवा खासगी वाहनावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तब्बल तीन वर्षानंतर सुरू होणाऱ्या विमानसेवेमुळे नांदेडकरांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

उलाढाल पण वाढत राहिल. अनेकांना रोजगार मिळेल. दिल्ली अमृतसर- मुंबई अशी विमान सेवा नांदेडच्या फायद्याची असणार आहे अशी सेवा सुरु होणे आवश्यक असल्याचे नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version