नांदेड| शहरातील ऑटोत विसरलेली बॅग मधील डायमंड ज्वेलरी, दोन मोबाईल असा एकूण 4,00,000/-लाखाचा मुद्येमाल नांदेड पोलीसांनी परत मिळवून दिला. पोलिसांनी शोध लावून हरवलेली साहित्य मिळवून दिल्याबद्दल पुजा राहुल भट्टट्टड यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

नांदेड शहरातील पुजा राहुल भट्टट्टड रा. सातारा ह.मु. दिलीपसिंग कॉलनी वजिराबाद हयांनी दिनांक 24.03.2024 रोजी गोविंद बाग गार्डन ते वजिराबाद ऑटोने प्रवास केला दरम्यान त्यांची ऑटोत विसरुन राहीली बॅग त्यामध्ये एक डॉयमंड ब्रासलेट किमत 3,50,000/- दोन मोबाईल किमत 45,000/- रुपये व नगदी रोख रक्कम 5000/- रुपये असा एकूण 4,00,000/- लाखाचा रुपयाचे चिज वस्तु गेल्या हे लक्षात आल्यावर त्यांनी पो.स्टे. वजिराबाद व मा. पोलीस अधिक्षक साहेब नांदेड यांना समक्ष भेट घेवून वरील हकीकत सांगीतली. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी लगेच सायबर पो.स्टे. चे पोउपनि श्री. गंगाप्रसाद दळवी यांना सदर प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यावरुन सायबर पो.स्टे.चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांना माहिती देवून घटनास्थळी पाठविले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोविंद बाग गार्डन ते वजिराबाद येथील सिसिटीव्ही फुटेज तपासून तक्रारदार महिलेने सांगीतलेले ऑटोचालकाचे वर्णनावरुन चौकशी केली असता ऑटो नंबर MH26BD419 असल्याचे समजले. त्यावरुन ऑटोचालकाचे नाव व पत्ता काढून सदर ऑटो चालक रुपसिंग रामसिंग मल्ली रा.लंगरसाहिव रोड नांदेड याची असल्याचे समझले. ऑटोचालकाचा शोध घेवून त्यास विचारपूस केली असता ऑटोचालक हा देखील विसरलेली बॅग देण्यास तयार होता पण सदर बॅग ही कोणत्या प्रवाशाची आहे हे त्याला समजत नव्हते. व त्याने बॅग मधील सर्व मुद्येमाल जशास तसा ठेवला होता. आज रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे समक्ष तक्रारदार महिलेस बॅग व बॅग मधील मुद्येमाल जशास तसा परत मिळवून दिला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री. अबिनाश कुमार नांदेड, पो.नि. जगदिश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे.चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व पोलीस अंमलदार राजेद्र सिटीकर, साहेबराव कदम, अनिल बिरादार यांनी पार पाडली. सदर कामगीरी बाबत मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ऑटो चालक रुपसिंग रामसिंग मल्ली व सर्व पोलीस अधिकारी व अंमलदाराचे अभिनंदन केले आहे तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना त्यांचे वाहनामध्ये प्रवाशाची विसरलेली कोणतीही वस्तु, मालमत्ता ही जवळच्या पोलीस स्टेशन येथे जमा करावी असे आवाहन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version