माजी नगरसेविका वैजयंती गायकवाड यांच्यी आयुक्ताकडे निवेदनाद्वारे मागणी

नवीन नांदेड। नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या प्रभाग १९ मधील जवळपास दोन हजार मालमत्ता धारकांना गेल्या अनेक दिवसांपासून भुमिगत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत परंतु संबंधितांना अद्यापही पाणीपुरवठा करण्यात आल्या नसल्याने अनेक मालमत्ता धारक पाणीपुरवठा पासून वंचित असल्याने तातकाळ पाणीपुरवठा चालू करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड यांनी निवेदनाद्वारे आयुक्त मनपा यांच्या कडे प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते भि. ना. गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेटुन केली आहे.

दिलेल्या निवेदनात,आंबेडकरवादी मिशन, यशोधरानगर, भास्करे नगर, वासवी क्लब, विणकर कॉलनी, गोदावरी हातमाग सोसायटी या परिसरासाठी सन २०१५ मध्ये असदवन येथील S – 6 जल कुंभापासुन भुमिगत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत परंतु गुत्तेदार व म.न.पा. प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे या भागातील जवळपास दोन हजार मालमत्ता धारकांना अद्याप ही पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. गूतेदाराने पाणीपुरवठा टेस्टिंग न देताच बिले उचलली आहेत.

शासकीय निधीच्या विनियोगाचा जनतेला अद्याप लाभ झालेला नाही. यातील अनियमित्तते साठी कोण जबाबदार आहे त्याची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करावी व जनतेला १५ दिवसात पाणीपुरवठा करावा या आशयाचे निवेदन म.न.पा. आयुक्तांना देण्यात आले. डॉ.महेश कुमार डोईफोडे आयुक्त यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संबंधीत फाईल घेउन चर्चेला येण्याच्या सूचना दिल्या. केलेल्या कार्यवाही बाबतचा प्रोग्रेस अहवाल १५ दिवसात देण्यात येईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावेळी यशोधरा नगर गृहनिर्माण संस्थेचे सचिव भास्करे व काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी किशनराव रावनगावकर उपस्थीत होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version