हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात ‘वार्षिक स्नेसंमेलन २०२३-२४ थाटामाटात पार पडला.  स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे सूप्त गुणांचे प्रदर्शन, स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद. हुतात्मा जयवंतराव पाटील,महाविद्यालय, हिमायतनगर येथे आदरणीय प्राचार्य डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून सांस्कृतिक विभागाच्या वतीने दि २७, ३०व ३१जानेवारी २०२४ रोजी वार्षिक स्नेहसंमेन थाटामाटात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी केले.त्या नंतर सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सांस्कृतीक विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक वि.प्रमुख डॉ .सविता ओ.बोंढारे व सांस्कृतिक वि.प्रमुख सहकारी डॉ.आशिष आ. दिवडे यांच्या हस्ते सर्वांना पुष्पगुच्छ भेट व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून गोड पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.पहिल्याच दिवशी संगीत खुर्ची ,धावणे ,रांगोळी, मेहंदी , दोरीवरच्या उड्या या पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.त्यात मुलींच्या बरोबरीनेच मुलांनीही उस्फुर्त सहभाग दर्शविला.

दि.३०जानेवारी रोजी मटका फोड या स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले,त्या नंतर ‘सोशल मीडियामध्ये गुरफटलेली आजची तरुणाई’या ज्वलंत विषयावर वक्तृत्व स्पर्धा पार पडली यात विद्यार्थिनी सोशल मीडिया मुळे होणारे फायदे व मोबाईल, ट्विटर,फेसबुक, व्हॉटसअप मुळे होणारे दुष्परिणाम, व्यसनाधीन झालेला तरुण वर्ग, वेळेचा अपव्यय ,नातेसंबंधातला दुरावा, सामाजिक ,आर्थिक बाबी स्पस्ट केल्या.या स्पर्धेमुळे युवकांना,त्यांच्याच मित्र-मैत्रिणींकडून चांगली कान उघडनी झाली.

चित्रकला या स्पर्धेत विद्यार्थ्यानी सुंदर चित्र रेखाटले,या स्पर्धेचा विषय ‘ मनातील एक अविस्मरणीय क्षण’ होता. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आयोजकांकडून विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापकांनाही चित्र काढण्याची परवानगी देण्यात आली होती.विद्यार्थ्यानी सुंदर निसर्ग,व्यक्तिचित्र, प्रदुशन, खेळाचे चित्र अशे विविध भाव दर्शविणारी चित्र रेखाटली. यानंतर लगेच ‘एक देश एक निवडणूक योग्य कि अयोग्य ‘ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांची दोन्ही बाजूवर जुगलबंदी झाली. यातून युवकांचे निवडणुकीबद्दलचे मत, हक्क, जबाबदारी, देशातील राजकारण,आर्थिक, सामाजिक दृष्टीकोन कळाला.

दि.३१जानेवारी रोजी सकाळी लिंबू चमचा या स्पर्धेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने मन मोहित केले.मुला मुलींच्या सहभागासोबतच महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही सर्व स्पर्धेत स्वतःचा सहभाग नोंदविला. स्नेहस्मेलंनाचा शेवटचा टप्पा , बक्षीस वितरण हा होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्ज्वला सदावर्ते, प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी.के. कदम व नॅक समन्वयक डॉ.गजानन दगडे लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचस पुष्पहार घालून पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.स्नेहस्मेलनाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या व प्रमुख अतिथीनी विजेत्या स्पर्धकांना गोल्ड,सिल्वर ,ब्राँझ पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तीन दिवसात एकूण बारा स्पर्धा पार पडल्या .कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन डॉ. आशिष दिवडे यांनी केले तर आभार डॉ. सविता बोंढारे यांनी व्यक्त केले. सर्वांच्या शुभेच्छा,सहकार्यातून कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्नेहसंमेलन कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version