नांदेड| नाटक हे मराठी संस्कृतीचे अविभाज्य अंग असून मुंबई-पुण्यापासून वाडी-तांड्यापर्यंत प्रत्येकाने या नाट्यपरंपरेचे जतन व संवर्धन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांत शेकडो वर्षांची परंपरा असणारी नाट्यमंडळे हे मराठी संस्कृतीचेच द्योतक आहे, असे प्रतिपादन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलात मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. तौर बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी रंगभूमीचा आढावा घेऊन विष्णुदास भावे ते राजकुमार तांगडे या काळातील नाटककारांचे योगदान स्पष्ट केले. रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व बॅकस्टेजचे कलावंत यांच्याही कार्याचा डॉ. तौर यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

नाट्यशास्त्र विभागातील प्रा. अभिजीत वाघमारे यांनी रंगभूमी दिनाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रारंभी रंगदेवता नटराजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. राहुल गायकवाड, डॉ. अनुराधा पत्की-जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले. रंगभूमी दिनाच्या या कार्यक्रमास प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. किरण सावंत, प्रा. शिवराज शिंदे, प्रा. कैलास पुपुलवाड, निशिकांत गायकवाड, प्रकाश रगडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. किरण सावंत यांनी आभार मानले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version