आरक्षण नाही मिळाल्यास मराठा समाज पेटून उठेल – मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांची मारतळा सभेत गर्जना
उस्माननगर, माणिक भिसे| येत्या २४ डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण नाही मिळाल्यास संपूर्ण मराठा समाज बांधव पेटून उठेल असे मत मारतळा ता.लोहा येथील विराट सभेत गर्जना केली. दि ८ डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील चार ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
त्यामधील मारतळा नायगाव,कंधार,मातोश्री काॅलेज जवळ वाडी पाटी येथे झालेल्या मराठा आरक्षण संबंधितच्या सभेस लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.दिनांक ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत काही मंत्री व नेते मराठा आरक्षणासंदर्भात बोलतील असा विश्वास मंत्र्यांनी दिला व तो शब्द ते पूर्ण करतील की नाही ते आज आपण पाहू असे मनोज जरांगे पाटील यांनी मारतळा येथे झालेल्या सभेत सांगितले. 24 डिसेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळेल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी दाखवला आणि जर 24 डिसेंबरला आरक्षण नाही मिळाले तर संपूर्ण मराठा समाज पेटून उठेल असे ते म्हणाले.
राजकारणी लोकांच्या नादी लागू नका ते आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील त्यांचे काही ऐकू नका. महिलांची महिलांनी जागृती करावी,पुरुषांची पुरुषांनी जागृती करावी.महिलांनी जनजागृती करताना लाजू नका आपल्या पोटच्या लेकरांसाठी भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवात मराठा भगिनीत जनजागृती करा असे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नागरिकास विनंती केली.आपण क्षत्रीय मराठी आहोत;आपल्यांना लढायचे आहे रणांगणात उतरलो तर आपण मागे हटत नाही दुसरा अंग म्हणजेच आपण शेतकरी आहोत आपण जमीन कसतो आणि या देशाला अन्नधान्य पुरवतो म्हणून एकजूट रहा लेकरांना मोठे करा लाजू नका मतभेद असतील तर सोडून द्या आपल्या सर्व नांदेड जिल्हा एकजूट झाला पाहिजे.घराघरातला लेकरांचा मराठा आरक्षणाने फायदा होणार आहे.
मी तुमच्या बळावर तुमच्या जीवावर,तुमचे आशीर्वादाने तेथे जीवाची बाजी लावून बसलोय तुम्ही माझ्या फक्त पाठीशी खंबीर राहा खांद्याला खांदा लावून धडा द्या.शांततेत आंदोलन करा उद्रेक करू नका;कोणीही आत्महत्या करू नका. जर पोरच अशी मरायला लागले तर आरक्षण भेटून काय फायदा असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले मी समाजाला विचारल्याशिवाय आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही आणि घेणार पण नाही मी बंद खोलीत चर्चा करू शकत नाही यानंतर जे आंदोलन होईल एवढी जनजागृती करा की 20 किलोमीटर पर्यंत मारतळाच्या परिसरात मराठ्यांना उभा राहिला जागा मिळाली नाही पाहिजे.मी माझा आयुष्य मराठा समाजाच्या नावावर केले आहे;फक्त मला मराठा समाजास आरक्षण मिळवून देऊन मराठा समाजातील मुलं-मुली नोकरी व उच्च शिक्षण घेताना दिसले पाहिजे,हेच माझे ते ध्येय आहे.असे विचार मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मारतळा येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या सभेत आपले विचार मांडले.