हस्तशिल्प सेवा केंद्रातर्फे सौभद्र मंगल कार्यालयात 31 ऑक्टोबर पर्यंत विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| भारत सरकारच्या हस्तशिल्प, वस्त्र मंत्रालय विकास आयुक्त कार्यालयाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर हस्तशिल्प सेवा केंद्राच्या माध्यमातून चैतन्यनगर येथील सौभद्र मंगल कार्यालयात 31 ऑक्टोबर पर्यंत विविध खादी ड्रेस, साडी, बांगड्या व इतर वस्तुंचे प्रदर्शन व विक्री ठेवण्यात आली आहे. संपूर्ण देशात 2 ते 31 ऑक्टोबर या कालावधी खादी महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. स्थानिक कारागीर, विणकर यांना चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम शासनाने घेतला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून कारागिरांना इथे निमंत्रीत करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात बंजारा उत्पादने, ज्यूटशिल्प, सोलापूर कॉटनवॉल हँगिंग, लाकडाची खेळणी, लाखेच्या बांगड्या व इतर साहित्य याचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नुकतेच या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी एमसीईडी नांदेडचे शंकर पवार, छत्रपती संभाजीनगर हस्तशिल्प सेवा केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक अमन कुमार जैन, हस्तशिल्प संवर्धन अधिकारी शैलेंद्र सिंह हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!