हिमायतनगर,परमेश्वर काळे| सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असताना गोरगरिबांची दिवाळी आनंदात व्हावी या उद्देशाने हिमायतनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील पालावर राहून जीवन व्यतीत करणाऱ्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली आहे. येथील मुलांना मिठाई, फराळासह फटाक्याची भेट देऊन त्यांच्या आनंदात भर टाकली आहे.

सर्व समाज घटकाचे आर्थिक दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येकाच्या घरी सुभता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक विकासाच्या योजना राबविण्यात येत असताना. याचं अनुषंगाने या वर्षीची दिवाळी आर्थिक दारिद्र्यामुळे पालावर राहून आपले जीवन व्यतीत करणाऱ्या समाजातील दुर्बल घटकांच्या घरातही दिवाळीचा आनंद फुलला पाहिजे. त्यांनाही मीष्ठान्नाचा स्वाद घेत फटाके आणि फुलझडांच्या दीपोत्सवामध्ये सहभागी होत आले पाहिजे. प्रत्येकाच्या घरातील दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी झाली पाहिजे अशा सूचना प्रदेशाध्यक्ष यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.

त्यावरून हिमायतनगर भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, संघटन मंत्री संजय गोडगे, जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, डॉ प्रसाद डोंगरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल यांनी सर्वाना सोबत घेऊन वंचित आणि गोरगरिबांच्या घरी भेट देऊन भेट देऊन दिवाळी साजरी केली आहे. येथील मुलांना मिठाईव फराळाचे वाटप करण्यात आले तर याचवेळी त्यांना फटाक्यांचा आनंद घेता आला. त्यामुळे पलावरील मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. यावेळी भाजपचे विपुल दंडेवाड, दुर्गेश मंडोजवार, कल्याण ठाकूर, लक्ष्मण डांगे, विशाल मंडलवार, जितू सेवनकर, बालाजी मंडलवाड, प्रकाश सेवनकर, परमेश्वर नागेवाड, विशाल अनगुलवार, रुपेश भुसावळे, तानाजी सोळंके, ओमकार चरलेवार, हरीश गुंडेकर यांच्यासह भाजपा व युवा मोचार्चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

