६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा; नांदेड+लातूर केंद्रातून ‘नेकी’ प्रथम

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड लातूर केंद्रातून सिध्द नागार्जुना मेडिकल असोसिएशन, नांदेड या संस्थेच्या नेकी या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच आंबेडकरवादी मंच, नांदेड या संस्थेच्या गटार या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नांदेड लातूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

सर्वोदय बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, लातूर या संस्थेच्या मुक्ती या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक रागेश्री जोशी (नाटक- नेकी), द्वितीय पारितोषिक राहूल जोंधळे (नाटक-गटार), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक माणीकचंद थोरात (नाटक- गटार), द्वितीय पारितोषिक- जितेंद्र बनसोडे (नाटक-पुरुष गाळणाऱ्या बायकांचा गाव), नेपथ्य : प्रथम पारितोषिक गौतम गायकवाड (नाटक- नेकी), द्वितीय पारितोषिक अनिल साळवे (नाटक- द अनॉनिमस), रंगभूषा : प्रथम पारितोषिक सचिन उपाध्ये (नाटक- मुक्ती), द्वितीय पारितोषिक रुपेश सुर्यवंशी (नाटक- विटो रखुमाय ) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक किशोर पुराणीक (नाटक-गंमत असते नात्याची ) व माधुरी लोकरे (नाटक-नेकी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे डॉ. अर्चना चिक्षे (नाटक-गंमत असते नात्याची), ऐश्वर्या डावरे (नाटक- चिरंजीवी), डॉ. स्वप्नजा जाधव (नाटक- मुक्ती), प्रतिक्षा पाटवकर (नाटक- विठो रखुमाय ), अपर्णा गोवंडे (नाटक- बॅरिस्टर), विजय गजभारे (नाटक-गटार), अतुल साळवे (नाटक- द अनॉनिमस), दस्तगीर शेख ( नाटक – संगीत दहन आख्यान), डॉ. मुकुंद भिसे (नाटक- द कॉन्शंस), डॉ. सत्यविजय जाधव (नाटक- बॅरिस्टर)

दि. २१ नोव्हेंबर, २०२३ ते १६ डिसेंबर, २०२३ या कालावधीत कुसुम नाट्यगृह, नांदेड व दगडोजीराव देशमुख सभागृह, लातूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. प्रताप सोनाळे, श्री. संजय द. पाटील आणि श्री. शंकर शंखपाळे यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!