
नांदेड। मागील 21 वर्षांपासून डॉ.बी आर आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. फाऊंडेशनचे अध्यक्ष बापुराव गजभारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पुरस्कारांची घोषणा केली.
पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्य व जिल्हा स्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवविले जाते तसेच सामाजिक, राजकीय, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य उद्योग, आरोग्य, प्रशासकीय सेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका महनीय व्यक्तीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार दिला जातो. गेली एकवीस वर्ष अनेक मान्यवर या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. संपूर्ण राज्यभरात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. प्रस्ताव न मागविता, व्यक्तीच्या कार्याची परस्पर दखल घेऊन दिला जाणारा पुरस्कार हे विशेप वैशिष्ठय आहे.
साल सन 2023 पासून विद्यार्थी वर्गासाठी एक पुरस्कार मनोज गजभारे स्मरणार्थ प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.रवी एन.सरोदे,राज्य स्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार लॉर्ड वुद्धा टि.व्ही.चे प्रतिनिधी सदाशिव गच्चे, जिल्हा स्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार प्रजावाणीचे उपसंपादक डॉ. अभयकुमार दांडग,कृष्णाई ग्रामीण वार्ताह वृत्तपत्र वृत्तपत्र छायाचित्रकार उत्तम हंबर्डे आणि स्मृतिशेष मनोज गजभारे प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार युक्ता प्रवीण बियाणी यांना देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. बी आर आंबेडकर फाऊंडेशनचे स्वागत अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,सचिव आकाश गजभार, उपाध्यक्ष सतीश बनसोडे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, सतीश पांडवे, महानगराध्यक्ष साहेबराव सोनकांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
