हिमायतनगर तहसील कार्यालयासह ठिकठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात साजरा
हिमायतनगर, परमेश्वर काळे| येथील न्यायालय, तहसील, पंचायत समिती, पोलीस ठाणे, नगरपंचायत, ग्रामीण रुग्णालय, शाळा महाविद्यालय यासह इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयात दि.२६ जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजारोहण करून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन मानवंदना दिली. तसेच येथील परमेश्वर मंदिर परिसरात राष्ट्रसाधना पब्लिक स्कुल, जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीराम आणि देशभक्तीपर गीतावर कलागुण सादर करत उपस्थितांची माने जिंकली.
शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायाधीश महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तहसिल कार्यालयात तहसीलदार डी. एन गायकवाड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर व्यसनमुक्तीची शपथ घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. शहरातील अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयात संबंधित प्रमुखांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी तिरंगा ध्वजास मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रगीत संपन्न झाले. पोलीस स्थानकामध्ये पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांच्या हस्ते हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पथसंचलन करून देशाप्रती आपली भावना प्रकट केली.
नगरपंचायत कार्यालयात प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड यांनी ध्वजारोहण केले आहे. डाक विभागात पोस्ट मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात सभापती गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर यांच्या हस्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती जनार्धन ताडेवाड यांनी ध्वजारोहण केले. बांधकाम विभागात अभियंता यांच्याहस्ते, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अधिकारी चव्हाण यांनी ध्वजारोहण केले. तालुका कृषी कार्यालयात कृषि अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
हुतात्मा जयवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत, राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत संचालकांच्या हस्ते, बालाजी विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल कन्या शाळेत, राष्ट्रसाधना पब्लिक स्कुल, गुरुकुल इंग्लिश स्कुल, श्री नृसिंह इंग्लिश स्कुल, रेल्वे स्थानक कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालयात, भुमी अभिलेख कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके, भारतीय स्टेट बँके, महाराष्ट्र ग्रामीण बैंक तर तालुक्यातील विविध गावातील ग्राम पंचायतचे सरपंच शाळेचे मुख्याध्यापक व कार्यालयातील अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रगीतानंतर ठिकठिकाणी उपस्थित नागरिकांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.