हदगाव। पवित्र गोदावरीच्या तिरावर मा.आ. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याशी बहुजन वर्गातील सर्व लोक त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवित आहेत. येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे आ गोपीचंद पडळकर यांच्यावर संकट आले तर बहुजन समाज गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला आहे. यावेळी हदगाव येथे एकच छंद गोपीचंद येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोषात दुग्ध अभिषेक करण्यात आला आहे.
लायकी नसणाऱ्या लोकांनी आ गोपीचंद पडळकर याना खालच्या भाषेमध्ये बोलतानाजी गरळ ओकलेली आहे त्यांची पापीदृष्टी पडलेली आहे,ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. आशा लोकांना आ गोपीचंद पडळकर यांच्या विषय बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्ही हदगाव येथे दुग्ध अभिषेक घालून पवित्र करत आहोत. असे धनगर समाजाचे डॅशिंग कार्यकर्ते विठ्ठल मस्के यांनी बोलताना सांगितले.
पुन्हा एकदा सांगायचे झाले की,महाराष्ट्रात दोन नंबरचा समाज म्हणून धनगर समाज ओळखल्या जातो. ज्या ज्या नेत्यांनी हरामखोरांनी आपली वाचाळ वाणी आमच्या कानी पडली. त्या त्या नेत्यांची येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या लायकी ची जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे बोलताना सांगितले. एकच छंद गोपीचंद येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोषात दुग्ध अभिषेक केला. यावेळी विठ्ठल मस्के पळसेकर,गजानन सुकापुरे डोंगरगावकर अवधूत चोंडेकर प्रशांत वीर ज्ञानेश्वर हुंबे लक्षीमन शिरगिरे आकाश शिरगिरे डॉ भगवान निळे,ओमकार हंडेवार, सह धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.