क्राईमनांदेड

हिमायतनगर पोलीसांची 7 दिवसांत तिसरी मोठी कारवाई; गोवंशाची तस्करी करणारी दोन वाहन पकडले

हिमायतनगर। हिमायतनगर शहरांतून तेलंगणा राज्यात गोवंशाची तस्करी करणाऱ्या दोन वाहनाला हिमायतनगर पोलिसांनी रंगेहात पकडून 7 दिवसात तिसरी मोठी कार्यवाही केली आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरी बाबत गोवंश प्रेमी नागरिकांतून पोलिसाच्या धाडसी कार्यवाहिचं कौतुक केलं जातं आहे.हिमायतनगर शहरांतून तेलंगणा राज्यात गोवंशाची तस्करी करणाऱ्या दोन वाहनाला हिमायतनगर पोलिसांनी रंगेहात पकडून 7 दिवसात तिसरी मोठी कार्यवाही केली आहे. यात 2 वाहनातून 23 गोवंश जप्त करण्यात आली असून, तीन आरोपीविरुद्ध प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरी बाबत गोवंश प्रेमी नागरिकांतून पोलिसाच्या धाडसी कार्यवाहिचं कौतुक केलं जातं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सकाळच्या रामप्रहरी हिमायतनगर येथे 4-30 वाजताच्या सुमारास एका मुस्लिम गोभक्ताने दिलेली माहिती आम्ही 112 वर कॉल करून पोलिसांना कळवली होती. हिमायतनगर पोलीस स्टेशन येथील नागरगोजे आणि गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक एस डी जराड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दोन्ही वाहनं MH26BE1813 आणि MH29BE5472 पकडून 23 गोवंशास जीवनदान दिले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सकाळच्या रामप्रहरी हिमायतनगर येथे 4-30 वाजताच्या सुमारास एका मुस्लिम गोभक्ताने दिलेली माहिती आम्ही 112 वर कॉल करून पोलिसांना कळवली होती. हिमायतनगर पोलीस स्टेशन येथील नागरगोजे आणि गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक एस डी जराड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ दोन्ही वाहनं MH26BE1813 आणि MH29BE5472 पकडून 23 गोवंशास जीवनदान दिले आहे. या संदर्भात कलम प्राणी अत्याचार प्रतिबंध कायदा 1960 अनुसार कलम 13, 11 (1) (ड)(ई)(फ) अंतर्गत प्राणी संरक्षण अधिनियम 5(A) 5(B) सहकलम 47 (अ)48,50,56(C) कलम 125 एम व्ही ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गोवंश आणि यापुर्वी देखील नांदेड जिल्ह्यात झालेल्या विविध कारवाई मध्ये जप्त केलेले गोवंश हे मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथुन कत्तलीसाठी तेलंगणामध्ये तस्करी केली जाते आहेत. त्यामुळे हिमायतनगर येथून तस्करी होणाऱ्या प्रकारावर लक्ष केंद्रित करून विश्व हिंदू परिषद नांदेड जिल्हा गोसेवा समितीचे किरण बीचेवार यांनी पोलीस प्रशासनाला विनंती वजा मागणी केली आहे की, संबंधित गोतस्करांचे जे रॅकेट आहे, त्याची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून पुन्हा अश्या घटना होणार नाही यासाठी ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.सदरील गोवंश आणि यापुर्वी देखील नांदेड जिल्ह्यात झालेल्या विविध कारवाई मध्ये जप्त केलेले गोवंश हे मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथुन कत्तलीसाठी तेलंगणामध्ये तस्करी केली जाते आहेत. त्यामुळे हिमायतनगर येथून तस्करी होणाऱ्या प्रकारावर लक्ष केंद्रित करून विश्व हिंदू परिषद नांदेड जिल्हा गोसेवा समितीचे किरण बीचेवार यांनी पोलीस प्रशासनाला विनंती वजा मागणी केली आहे की, संबंधित गोतस्करांचे जे रॅकेट आहे, त्याची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून पुन्हा अश्या घटना होणार नाही यासाठी ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

विदर्भातुन होत असलेल्या गोवंशाच्या तस्करी संदर्भात आम्ही माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य व माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे रीतसर निवेदन देऊन या तस्करांचा पर्दाफाश करण्याची विनंती केली असल्याची माहिती देखील किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी कळविले आहे.

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीक अधिकारी श्रीमती कोमल कांगने मॅडम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, फिर्याद श्री शामसुंदर नागरगोजे, पवन चौदंते एनपीसी 895 हे करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत आरोपी शेख सूल्तान शेख अल्लीवल्ली मालक चालक, 28 रा सुकळी ज. ता ऊमरखेड, चालक अक्रमखान ऊस्मानखान वय 54, रा जामामस्जीद ऊमरखेड जिल्हा, यवतमाळ, शेख फैजान शेख निसार वय 16 हल्ली मुक्काम ऊमरखेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक एस डी जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीक अधिकारी श्रीमती कोमल कांगने मॅडम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, फिर्याद श्री शामसुंदर नागरगोजे, पवन चौदंते एनपीसी 895 हे करीत आहेत. आरोपी शेख सूल्तान शेख अल्लीवल्ली मालक चालक, 28 रा सुकळी ज. ता ऊमरखेड, चालक अक्रमखान ऊस्मानखान वय 54, रा जामामस्जीद ऊमरखेड जिल्हा, यवतमाळ, शेख फैजान शेख निसार वय 16 हल्ली मुक्काम ऊमरखेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली असून, 23 गोवंश येथील गोशाळेत ठेवण्यात आली आहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!