
हिमायतनगर| गोर शिकवाडी समाज बांधवाना खोटं बोलल्याचा निषेधार्थ हिमायतनगर तालुक्यातील गोर शिकवाडी व गोरसेना कुटुंब मिळून दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर समोर महाराष्ट्र सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करून पुतळ्याचे दहन करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
बंजारा समाजाच्या व तत्सम जाती विमुक्त जाती अ प्रवर्ग इतर 14 जातीसस सर्व जातीनिहाय समाज बांधव मिळून दिनांक 8 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे दुसरे दिवशी जन आक्रोश मोर्चाचे नियोजन केले होते. त्यावेळी विधान भवन परिसरात सामाजिक न्याय मंत्री हे हजर असून खोटे बोलन्यात आले. विधान भवन परिसरामध्ये ते नाहीत असे सांगितले गेले, वास्तवात सदर मंत्री महोदय हे विधान भवनामध्ये हजर असल्याने दिसून आले. ही बाब विमुक्त जात अ प्रवर्गातील नागरिकांची मानहानी करणारी आहे. त्यामुळे सर्व समाज बांधव सदर बाबीचा निषेध म्हणून संबंधित मंत्री व विद्यमान सरकारचे प्रतिमेस जोडे मारून आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेचे सार्वजनिक दहण करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे हिमायतनगर तहसील व पोलीस प्रशासनाला दिला आहे.
या निवेदनावर गोर सिकवाडी कुटुंब हिमायतनगरचे डॉक्टर दामोदर जेमला राठोड संयोजक गोरसिकवाडी, सुनील लक्ष्मणराव चव्हाण अध्यक्ष गोरसिकवाडी हिमायतनगर, श्री लखन जाधव माजी अध्यक्ष गोरसिकवाडी हिमायतनगर, अंकुश चव्हाण सदस्य गोरसिकवाडी उपाध्यक्ष, जगदीश जाधव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोर शिकवाडी आदींसह गोर शिकवाडी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
