हिमायतनगराच्या लकडोबा चौकातील वैकुंठधाम स्मशानभूमी विकासासाठी भरघोस निधी देण्याचे खासदार हेमंत पाटील यांचे आश्वासन
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील लकडोबा चौक परिसरात असलेल्या वैकुंठधाम स्मशान भूमीला लोकनेते शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाबुराव कदम कोहळीकर यांनी शनिवार रोजी भेट देऊन समितीशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मृत्यूनंतर प्रेताची होणारी अवहेलना थांबविण्यासाठी स्मशान भूमीसाठीच्या विकासासाठी खासदार हेमंत भाऊ यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात फोनद्वारे मागणी केली. येथील स्मशानभूमीच्या विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून स्मशान भूमीचा कायापालट केला जाईल असे आश्वासन दिल्याने बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याने स्मशान भूमीचा विकास साध्य होईल अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.
हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक परिसरात हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागे वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. या स्मशान स्मशानभूमीची सुधारणा करण्यासाठी मागील दोन महिन्यापूर्वी कमिटी तयार करून प्रत्येक सदस्याचा वाढदिवस स्मशानात करत समाजामध्ये वेगळा संदेश देण्याचे काम केले जात आहे. एव्हडेच नाहीतर दर रविवारी सकाळी सर्व समिती सदस्याकडून दोन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. हि बाब लक्षात आल्यानंतर दि 9 डिसेंबर रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी लकडोबा चौकातील हिंदू स्मशान भूमीला भेट देऊन कमिटीच्या सदस्यांकडून होत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
तसेच दोन तास या ठिकाणी थांबून कमिटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांशी चर्चा करून स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी आणि मृत्यूनंतर प्रेताची होणारी अवहेलना थांबविण्याच्या दृष्टीने हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दरम्यान बाबुराव कदम कोहळीकर यांनी स्मशान भूमी समितीचे अध्यक्ष श्याम ढगे यांची फोनवरून चर्चा करून दिली. यावेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी हिमायतनगरातील लकडोबा चौकात असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या विकास कामासाठी लवकरच आराखडा तयार करून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हिमायतनगर येथील वैकुंठधाम स्मशान भूमी परिवाराकडून खासदार हेमंत भाऊ पाटील व लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
येथील स्मशान भूमीच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाल्यास स्मशान भूमीचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी हदगावचे शिवसेना तालुका प्रमुख हदगाव विवेकराव देशमुख, हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, निवघा येथील उपचेअरमन सुदर्शन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे, खा.हेमंतभाऊ पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आशिष सकवान, शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख राजेश जाधव, श्रीदत्त पाटील सूर्यवंशी, विलास वानखेडे, बालाजी राठोड, वामनराव मिराशे, अभिलाष जयस्वाल, गोपाळ नप्ते, गजानन हरडपकर, दत्ता सूर्यवंशी, परमेश्वर तिप्पनवार, सुधाकर चिट्टेवार, राम जाधव, लक्ष्मण डांगे, साहेबराव आष्टकर, सुभाष बलपेलवाड, दिलीप ढोणे, संतोष कदम आदीसह लाकडोबा चौक स्मशान भूमी परिवारातीळ सर्व सदस्य उपस्थित होते.
०१ ऑकटोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून स्वच्छंजली कार्यक्रम राबविण्यात आला होता. तेंव्हापासून लाकडोबा चौकातील स्मशानभूमीच्या आवारात बदल दिसू लागला असून, आता यात भर म्हणून खासदर हेमंत पाटील यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे नक्कीच येथील स्मशान भूमीचा कायापालट होईल अशी अपेक्षा सर्वाना आहे.