नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 28,25,300/- रूपयाचे 164 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत सायबर पोलीस स्टेशन नांदेडची कार्यवाही

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी जगदीश भंडरवार प्रभारी पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांना आदेशीत केले होते. त्यानुसार त्यांनी सायबर पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.

नांदेड जिल्हयातील पोलीस स्टेशनचे अंमलदार व स्था.गु.शाचे पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा वेगवेगळया ठिकाणी जावून शोध घेवुन एकूण 164 मोबाईल किंमत 28,25,300/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्याचे आज एकत्रितरीत्या मा.श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड. यांच्या हस्ते 70 मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत हस्तगत झालेले मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे Facebook Page (Nanded Police) व Twitter (@Nanded Police) वर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे अवाहन मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री. अबिनाश कुमार नांदेड, डॉ.श्री खंडेराय धरणे. अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्रीमती. डॉ. अश्विनी जगताप पोलीस उपअधिक्षक (गृह) पो.नि. जगदिश भंडरवार आगुशा.पो.नि.श्री उदय खंडेराय स्थागुशा, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे.चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, रेषमा पठाण, दाविद पिडगे, काशिनाथ कारखेडे, मोहमद आसिफ, दिपक शेवाळे, विलास कदम, राजीव बोधगिरे, अकबर पठाण, व्यंकटेश सांगळे यांनी पार पाडली. सदर कामगीरी बाबत मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदाराचे अभिनंदन केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!