नांदेड l सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक आठ जुलै रोजी नांदेड शहरामधे सकाळी११ राज काॅर्नर तरोडेकर चौक-राजमाता जिजाऊचौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय.टी.आय. चौक-शिवाजीनगर-एस.पी.ऑफीस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर या मार्गाने भव्य शांतता रॅली निघणार आहे व मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवास छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातुन संवाद साधणार आहेत.सदरील रॅलीचे नेतृत्व मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत.

मागील पंधरा दिवसापासुन सदरील रॅलीच्या नियोजनासाठी अखंड मराठा समाज नांदेड जिल्हा व जिल्हा नियोजन समिती यांच्याकडुन रॅलीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. २०जुन २०२४ रोजी अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याची एक सामुहिक बैठक पार पडली सदरील बैठकीत अनेक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले जसे की जिल्हा बैठक,तालुका बैठक, गावागावातील बैठक घेऊन जनजागृती करण्याचं काम समाज बांधवांनी हाती घेतले, तसेच रॅलीच्या नियोजना साठी लागणारे सर्व साधणांची जबाबदारी सुद्धा वाटुन देण्यात आली अखंड मराठा समाज नांदेड च्या सर्व कार्यकर्त्यांनी व समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी मागील पंधरा दिवसापासून अथक परिश्रम घेतले आहे आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याला तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेला जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, आठ जुलै च्या रॅली संदर्भात ज्या काही सोई सुविधा लागतील त्या सर्व उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे व जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील, गावागावातील समाज बांधवांना आग्रहाची विनंती करण्यात येत आहे की, मराठा समाजाला ओबिसीतुन कायम टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी आपण लाखोच्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे.गाव खेड्यातुन तालुक्यातुन येणाऱ्या सर्व समाज बांधवांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

नवा मोंढा मैदान, शासकीय तंत्र निकेतन, कॅनॉल रोड ,नागार्जुन पब्लिक स्कुल या ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे जेवणाची व्यवस्था,पाण्याची व्यवस्था,तसेच रॅली निघणाऱ्या मार्गात जागोजागी खिचडी वाटप रॅलीच्या समारोपाच्या ठिकाणी योग्य अशी साऊंड सिस्टिम ची व्यवस्था, जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये आंतरवाली सराटी पासुन येणाऱ्या पाहुण्यांची मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था,मुक्कामाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, रॅली मार्गात जागोजागी सत्कार समारंभ असे सर्व नियोजन जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत करण्यात आले आहे.

प्रशिक्षित मराठा स्वयं सेवकांची एक मोठी फळी सुद्धा तयार करण्यात आली आहे मराठा सेवकांना लागणारी साधन सामग्री जसे की, टी-शर्ट, गळ्यामध्ये आयडी कार्ड आणि संपुर्ण रॅलीला कव्हर करण्यासाठी शंभर वाकी टॉकीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे तरी मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने पावसाळा असल्याने छत्री,रेणकोट घेऊन शांतता संवाद रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version