नांदेड। महाराष्ट्र शासनाने नुकतेच सामाजिक अभिसरण क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मा.मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री अध्यक्ष असलेल्या, राज्य स्तरीय समितीने डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार सन २०१९ -२०, २०२०-२१ ,२०२१-२२ व २०२२-२३ दि.७ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय काढून जाहीर केले आहेत.

समाज उत्थानाचे मौलिक कार्य करणारे हात पुढे यावेत,पुढे आलेल्यांचा सन्मान व्हावा व पुढील पिढीला प्रेरणा मिळून नवीन समाज सेवक तयार व्हावेत, या उदात्त हेतूने सन.१९७१-७२ पासून हे पुरस्कार योग्य व्यक्तीं दिले जात आहेत व १९८९ पासून संस्थांना ही पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. साहित्यिक देवीदास फुलारी यांना सन.२०२२-२३ चा डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून रोख रक्कम रु. २५०००/- व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे.

देवीदास फुलारी यांची कादंबरी, समीक्षा, कविता आणि बाल साहित्य या प्रकारात १५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. समाज प्रबोधन करणारा फर्डा वक्ता अशी त्यांची सबंध महाराष्ट्रात ओळख झालेली आहे. अलिकडेच नांदेड जिल्हा परिषदेचा रोख रक्कम दोन लाख असे स्वरूप असलेला नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण या पुरस्काराचे वितरण दि.१२ मार्च २०२४ रोजी नॅशनल सेंटर फॅार परफॅार्मिंग आर्ट नरीमन पॅाइंट,मुंबई-२१ येथे होणार असल्याचे मा.शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त नांदेड,दत्ता हरी कदम समाज कल्याण निरिक्षक, नांदेड यांनी लेखी पत्राद्वारे अभिनंदन करून कळवले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version