नांदेड| राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या जलरथाचे हिरवी झेंडी दाखवून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या हस्‍ते आज उद्घाटन करण्‍यात आले. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 16 तालुक्यासाठी जलरथ तयार करण्‍यात आला आहे. जलरथाचा शुभारंभ आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या प्रांगणात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले, सामान्‍य विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार, ग्राम पंचायत विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रसाद चन्‍ना, महिला व बाल विकास विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, भारतीय जैन संघटनेचे हर्षद शहा, राजीव जैन, सोनल रावक, स्‍मीता जैन, प्रविण मनोहरे, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, उप शिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर, उपाभियंता वाडीकर, अडबलवार, अधिक्षक कल्‍केश शिरशेटवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी हिरवी झेडी दाखवून रथ रवाना करण्‍यात आला.

या जलरथावर जल जीवन मिशन, स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण तसेच गाळमुक्‍त धरण- गाळयुक्‍त शिवार व जलयुक्‍त शिवार आदी विषयाचे चित्र, झिंगल, हॅंडबिलसह भारतीय जैन संघटनेचे स्‍वयंसेवक गावा-गावात जनजागृती करणार आहेत. यावेळी डी.डी. पवार, मिलिंद व्‍यवहारे, विशाल कदम, नंदलाल लोकडे, विठ्ठल चिगळे, सूर्यकांत हिंगमीरे, निकीशा इंगोले, कपेंद्र देसाई, कृष्‍णा गोपीवार, सुशील मानवतकर, प्रति‍भा बिरादार, सारीका कदम यांच्‍यासह गट समन्‍वयक व समुह समन्‍वयक यांची उपस्थिती होती.

जलरथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स तसेच गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. ग्रामस्थांना पॉम्पलेट दिले जाणार आहेत नियुक्त केलेल्या समन्वयकांमार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यात येईल. गावातील ग्रामस्थांनी जलरथाच्या माध्यमातून योजनांची माहिती घेऊन गावातील पाण्याचे स्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी नोंदविण्याचे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version