नांदेड,अनिल मादसवार| जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्‍या कामांना टाटा कन्‍सल्‍टन्‍सी सर्विसेस या त्रस्‍तयंत्रणेकडून तपासणी केलेल्‍या कामासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेला उत्‍कृष्‍ट दर्जा प्राप्‍त झाला आहे.

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या गुणात्मक दर्जा तपासणी करिता महाराष्ट्र शासनामार्फत टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मुंबई या संस्थेची निवड करण्यात आली आहे. सदरील संस्थेतर्फे नळ योजनांच्या पाईपांचा दर्जा, पाईपाची खोली, वापरण्यात येणा-या साहित्याची चाचणी, करण्यात येणाऱ्या काँक्रीट टेस्टची स्‍ट्रंच तपासणे, मोटारीची कंपनी, विहिरीची खोली, विहीर बांधकामाचा दर्जा, पाण्याची गुणवत्ता इत्यादी सर्व तांत्रिक बाबीचे परीक्षण करून तपासणी अहवाल संस्थेने नांदेड जिल्हया करिता नेमलेल्या पथक प्रमुख श्री राजकुमार यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच नळ पाणीपुरवठा योजनेची अदा करण्यात येतात.

सदरील थर्डपार्टीने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 587 कामांना भेटी दिल्या आहेत. भेटी दिलेल्या 587 कामांपैकी एकूण 290 इतक्या कामांना उत्कृष्ट असा शेरा प्राप्त झाला असून, एकूण 210 इतक्या कामांना समाधानकारक असा शेरा दिलेला आहे. 87 कामांचे अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एखाद्या कामावर काही त्रुटी आढळून आल्यास त्याची पूर्तता सात दिवसाचे आत पूर्ण करून यंत्रणेकडून पुनश्च पाहणी करून नंतर अहवाल सादर करूनच देयकाची पूर्तता करण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच थर्ड पार्टी भेटी देऊन तपासणी अहवाल लेखी स्वरूपात सादर केल्यानंतरच सदरील दयके अदा करण्यात येतात.

जल जीवन मिशनच्या प्रगतीपथावरील सर्व कामांना टाटा कॉन्सन्टन्सची त्रेयस्‍थ यंत्रणा, जिल्हा परिषदेचे उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच वॅपकॉस कंपनीचे अभियंते कामांना नियमित भेटी देतात. आढळून आलेल्या त्रूटींची पूर्तता करुन घेतात. या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्‍हा परिषेदेतील खाते प्रमुखांना 16 तालुक्याकरिता संपर्क अधिकारी नेमलेले आहेत. हे अधिकारी त्यांच्‍या दौ-यांच्‍या वेळी जल जीवन मिशनच्या कामांना भेटी देतात. तालुका स्तरावरून यासंदर्भाने आढावा घेतात. जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले व कार्यकारी अभियंता अमोल पाटील हे देखील त्यांच्या तालुकास्तरीय दौऱ्यांमध्ये त्या-त्या तालुक्यातील उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचा आढावा घेऊन कामांना भेटी देऊन कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासत असल्यामुळे या कामांना गती मिळत आहे.

जिल्ह्याचा आतापर्यंतचा मासिक टंचाई काळातील इतिहास पाहता एकूण ट्रॅक्टरची असलेली जवळपास 487 इतकी संख्या मागील तीन वर्षांमध्ये कमी होऊन मागील वर्षी फक्त 8 टँकर पर्यंत कमी झाली आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, सर्व उप अभियंते यांच्या सामूहिक प्रयत्नांनी यावर्षी नांदेड जिल्हा टँकर मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्‍ये जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून जिल्हा टँकर मुक्त करण्याच्या कामात सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने करण्यात आले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version