नवीन नांदेड| अयोध्या येथील श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने देशभर साजरा होत असून हडको भागातील बालाजी मंदीर येथे २२ जानेवारी रोजी विश्वस्त समितीचा वतीने दीपोत्सव प्रज्वलीत करून जयश्री राम नाव धनुष्यबाणातुन तर पणतीतुन राममंदिर साकारले असून महिला भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली.

हडको येथील बालाजी मंदीर येथे दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमाने हे मंदीर नावलौकिक असुन २२ जानेवारी रोजी सायंकाळी मंदीर विश्वस्त समिती अध्यक्ष अरूण दमकोंडवार, बालासाहेब मोरे,बाबुराव येरगेवार, प्रकाशसिंग परदेशी, विवेकानंद देशमुख, रमेश शिंदे, दिलीप कदम, आवचाटे, त्र्यंबक सरोदे, यांच्या सह दुबे महाराज, प्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या मंदीर प्रभु जयश्री राम यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने सकाळी भगवान बालाजी मुर्ती अभिषेक, भजन सध्या, रामरक्षा, महाआरती व सायंकाळी दीपोत्सव मधुन जयश्री राम धनुष्य बाणातुन व मंदीर प्रतिकृती साकारली.

यावेळी महिला भक्त गण मोठया संख्येने उपस्थित होते. दीपोत्त्सवातुन साकारलेली प्रतिकृती फोटो काढण्यासाठी व भगवान बालाजी दर्शन घेण्यासाठी सायंकाळी मोठया प्रमाणात भाविक भक्तांनी गर्दी केली होती .

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version