हिमायतनगर। येथील श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रेमध्ये दोन दिवसात संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेत तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या उमरहिरा तांड्याच्या जय सेवालाल क्रीडा संघाने अव्वल क्रमांक प्राप्त करून परमेश्वराचा आशीर्वाद मिळविला आहे. या विजय संघाला मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते ट्रॉफी आणि पहिल्या क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या यात्रेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दिनांक 17 रोजी दुपारी सुरुवात करण्यात आली होती. या स्पर्धेत सात कबड्डी संघाने सहभाग घेतला असून, दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमुळे यात्रेमध्ये चांगलीच रंगत आली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी फायनल स्पर्धा रात्री आठ वाजेपर्यंत प्रकाश झोतात चालविण्यात आली. शेवटच्या फायनल स्पर्धेने उपस्थित प्रेक्षकांना खिळून ठेवत वाहवा मिळवली. फायनलची स्पर्धा जय सेवालाल संघ आणि शासकीय आश्रम शाळा दुधड संघामध्ये अटीतटीत झाली यामध्ये जय सेवालाल संघाने विजय मिळविला.
त्यामुळे शासकीय आश्रम शाळा दुधड या संघाला दुसऱ्या क्रमांक जाहीर करून 15 हजाराचे बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर जय बिरसा क्रीडा संघ हुडी या संघाच्या खेळाडूंनी तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले. या सर्व विजयी संघाचे मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, क्रीडा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एड दिलीप राठोड, उपाध्यक्ष सूर्यकांत ताडेवाड, बाबूराव बोड्डेवार, सचिव के बी शनेवाड, बी आर पवार, सोनबा राऊत, गजानन ताडकुले, बबलू काळे, सुभाष गायकवाड, कापसे सर, तुकाराम अडबलवाड, बाळासाहेब हरडपकर, सुभाष शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, पापा पार्डीकर, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, राम नरवाडे, देवराव वाडेकर, मारोती वाघमारे, अर्जुन राऊत, कदम सर, दत्ता देवकते, राजू राहुलवाड, दिगंबर वानखेडे, संदीप तुपतेवार, बालाजी बनसोडे, आदिंसह क्रीडा प्रेमी नागरिक व खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते. कब्बडी स्पर्धेचे सुरेख असं सूत्रसंचालन अशोक अनगुलवार यांनी केले तर आभार संजय माने यांनी मानले.
Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version