नांदेड। येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बधिरीकरणशास्त्र विभागास 8 नविन अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन रुग्णसेवेसाठी प्राप्त झाले आहे. या मशिनचे उद्घाटन व हस्तांतरण महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख  यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक अनेस्थेशिया वर्क स्टेशन मशिनमुळे रुग्णांचे लॅप्रोस्कोपीक ऑपरेशन करणे सोईचे होईल.

या मशिनमध्ये Multipara Monitor, Ventilator, Boyle’s Machine (भुल देण्याकरीता लागणारे यंत्र) या सर्व सुविधा एकत्रितरित्या सामाविष्ट असल्यामुळे ते रुग्णांना येणाऱ्या अडचणी दुर होण्याकरीता व रुग्णसेवा अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरीता उपयोगी पडणार आहे.  तसेच या मशिनमध्ये रक्तदाब, प्राण वायू, रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोजने, मेंदूचे सुक्ष्म निरीक्षण या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे रुग्णांच्या उपचाराकरीता तसेच पदविपूर्व व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये याचा उपयोग होणार आहे. रुग्णांच्या उपचारादरम्यान अत्याधुनिक शस्त्रक्रियेसाठी या मशिनचा उपयोग होईल असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख  यांनी सांगितले. 

विभाग प्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक सादर केले आणि या मशिनचे महत्व सांगितले. त्याचबरोबर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. सचिन तोटावार, सहयोगी प्राध्यापक बधिरीकरणशास्त्र यांनी या मशिनमुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करता येईल असे सांगितले.

या कार्यक्रमास उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण, डॉ. संजयकुमार मोरे, डॉ. चंडालिया, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, तसेच अध्यापक वर्ग निवासी डॉक्टर व परिचारीका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉ. राजकुमार गीते यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version