श्रीक्षेत्र माहूर/नांदेड| माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नखेगाव ते हिवळणी फाट्यामधील मुख्य रस्त्यावर असलेल्या राठोड यांच्या शेताच्या धुर्यावर अज्ञात महिलेला पालापाचोळा पराट्याटाकून जिवंत जाळल्याची घटना दिनांक ५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. खळबळजनक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक ६ रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृषण कोकाटे यांची भेट देऊन महीलेचा पथकामार्फत शोध सुरु केला आहे. वृत्त लिहीपर्यंत ती महिला कोण..? हा प्रश्न अनुत्तरित होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील हिवळणी फाट्‌याजवळ असलेल्या राठोड यांच्या शेतात विहिरीजवळ स्प्रिंकलरची ३९ पाईप आणि आठ नोझल आहेत. त्याच्या बाजूलाच पावसाळ्यात इंधन म्हणून कमी यावं यासाठी कापसाच्या झाडाच्या पात्लाट्‌यांचा ढीग मारून ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणीच सदरील महिला जळून राख झालेले अवस्थेत दिसून अली आहे. पोलिसांच्या पाहणीत तिच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले. या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा तेथे आढळून आला नाही.

रात्री आठ वाजता राष्ट्रीय महामागार्पासून २०० मीटर अंतरावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांना आग दिसल्याने त्यांनी तुळशीराम राठोड यांच्या घरी दूरध्वनीवरून कल्पना दिली. त्यामुळे त्यांनी शेतात येऊन बघितले असता त्यांना स्प्रिंकलर आणि पाईप पराट्या जळलेल्या अवस्थेत दिसल्या तर एक महिलाही संपूर्णपणे जळून राख झालेले अवस्थेत दिसल्याने त्यांनी माहूर पोलीस ठाण्यात दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती दिली होती.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे, पोलीस ठाण्याचे सपोनि शिवप्रकाश मुळे, सपोनी मांडवी गफार शेख, सिंदखेड सपोनी सुशांत किनगे, सपोनी संग्राम परगेवार, पो उपनि आनंदराव बाठोरे, पालशिंग ब्राहाण यांचे सह पोहे का पांडुरंग गुरुजुले, कपिल रावळे, सुनील पल्लेवाड, पोहे का गजानन चौधरी, नवन्नाम कोरडे, बालाजी राठोड, रोहित इंगोले, पवन राऊत, महिला पोलीस माला कनाके, पुष्पा पुसनाके, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि उदय खंडेराय, पोहेका सुरेश घुगे, देवा चव्हान, राजु पुल्लेवार, श्रीरामे सह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माहूरच्या रुग्णालयात आणण्यात आला. घटनेचा पुढील तपास सपोनी शिवप्रकाश मुळे हे करीत आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version