नांदेड| मला लहानपणापासूनच समाजातील खूप चांगल्या लोकांचा सहवास लाभला. तस-तसी माझ्या विचारात प्रगल्भता येत गेली. त्याच प्रमाणे मी गावाचा विकास व सेवा केली. यामध्ये मला सर्वांनी साथ दिली आणि गावाचा विकास होत गेला, असे मत धुळे जिल्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. चैत्रामजी पवार यांनी व्यक्त केले.

ते दि. २१ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलामध्ये आयोजित प्रकट मुलाखत मध्ये संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे यांच्याशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. हनुमंत कंधारकर, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती.

चैत्राम पवार यांची ३२ वर्षाची संघर्षमय वाटचाल, वनभूषण ते पद्मश्री पर्यंतच्या यशस्वी प्रवासामध्ये त्यांनी वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा, जनसंपदा आणि गोसंपदा यांचं योग्य व्यवस्थापन करून शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावात शाश्वत विकासाचे प्रयोग यशस्वी करत गावाचा सर्वांगीण विकास केला. यामध्ये पद्मश्री चैतरामजी पवार यांच्या वाटचालीतील घडामोडी व भविष्यातील वाटचाल याची पाने या प्रकट मुलाखतीत उघडली गेली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वैजनाथ अनमुलवाड, प्रा. पुयड, प्रा. चैतन्य, प्रा. बोधगिरे, प्रा. भीमा केंगले, प्रा. बाबुराव जाधव, प्रा. शालिनी कदम, प्रा. नायर मॅडम, प्रा. ओंकार मठपती, इंजि. तानाजी हुस्सेकर, सहा. कुलसचिव पेदेवाड, तुकाराम भुरके, पुरुषोत्तम पल्लेवाड, रामदास खोकले यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रमोद लोणारकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version