नवीन नांदेड। नांदेड येथे महिला कॉग्रेस मेळाव्यास वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश बसवदे यांनी केलेल्या आवाहनाला माजी लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर सिडको हडको वसरणी,कौठा,भागातून शेकडो महिला रवाना झाल्या आहेत, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वाहनाने या महिला रवाना झाल्या आहेत.

नांदेड जिल्हा व शहर महिला काँग्रेस मेळावा २८ जानेवारी नांदेड येथे भक्ती लाॅन्स, तरोडा नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यास उपस्थिती राहण्यासाठी वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश बसवदे, नांदेड शहर महिला काँग्रेस शहर अध्यक्ष ललिता शिंदे, माजी नगरसेवक राजु पाटील काळे, उदय देशमुख, संजय इंगेवाड,संजय मोरे, सिध्दार्थ गायकवाड,डॉ.करूणा जमदाडे, सौ. दिपाली मोरे,राजु लांडगे,गणेश काकडे यांच्या सह पदाधिकारी यांनी केले होते, आवाहानाल प्रतिसाद देत सिडको, हडको, वाघाळा, वसरणी, कौठा, असरजन, या भागातून शेकडो महिला वाहनाने मेळाव्यास रवाना झाल्या, या वेळी काँग्रेस पक्षाच्या विजय असो, अशोकराव चव्हाण आगे बढो, घोषणा दिल्या.

नवनिर्वाचित वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश पा. बसवदे यांनी मेळाव्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे व काँग्रेस पक्षातील पदाधिकारी एकजूटीमुळे शेकडो महिला सिडको परिसतातुन एवढया मोठया प्रमाणात मेळाव्यास रवाना झाल्याचे पाहवयास मिळाल्या..

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version