नांदेडमध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

नांदेड। दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश होता. त्यानंतर शिवसेना खासदारांनी केलेल्या पाहणीमध्ये अस्वच्छता दिसून आल्याने रुग्णालयाचे अधिष्ठाता याना शौचालयाची स्वच्छता करायला लावली होती. त्यामुळे अधिष्ठातांनी दिलेल्या तक्रारीनंतर खासदार हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या संबधित तक्रार दाखल केली आहे. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन 40 हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास सांगण्यात आले होते. इतकेच नाही रक्त व इतर तपासण्यासाठी देखील पैसे खर्च करावे लागले होते. अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी रुग्णाच्या उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

नांदेड मधील शासकीय रुग्णालयामध्ये 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. महिलेचाही मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली. त्यामुळे महिलेचे नातेवाईक असलेल्या कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये बुधवारी रात्री शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version