हिमायतनगर | गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असताना शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्रीभर कोसळत राहिला. शनिवारी सकाळी पळसपुर येथील नागनाथ मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. सुदैवाने मंदिराला कोणतीही हानी झाली नाही.

तथापि, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. लहानमोठ्या नाल्यांना पूर येऊन वडगाव (ज), पळसपुर, सिरपलीसह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. शहरात नाल्याचे पाणी घरांमध्ये आणि बाजारातील दुकानांमध्ये घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

शेतीचे प्रचंड नुकसान
नदी-नाल्यांचा पूर शेती बांध फोडून शेतात घुसला, परिणामी शेतकऱ्यांची बहरलेली कापूस, सोयाबीन, तूर यासारखी पिके उद्ध्वस्त झाली. पावसामुळे उभे असलेले कापूस पिके आडवी झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वाहतुकीवर परिणाम
जवळगाव रेल्वे अंडरब्रीज पाण्याखाली गेला. येथे थार जीप अडकली असली तरी चालक आणि एक व्यक्ती सुखरूप बचावली. ट्रॅक्टरच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली. नांदेड-किनवट महामार्ग तसेच हिमायतनगर रेल्वे स्टेशन मार्गावर पाणी साचल्याने काही तास वाहतूक ठप्प राहिली. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले असून, महसूल प्रशासनाकडून जनतेला आवाहन केलं कि, पाण्याच्या ठिकाणी कुणीही जाऊ नये आणि मदतीची आवश्यकता भासल्यास प्रशासनाला संपर्क करावा असे तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केलं आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version