नांदेड/भोकर। “भक्ती हि थोंताड नव्हे”-ज.न.म प्रवचनकार सौ सुनंदा श्रीरामे पाटील ओमसाई व्हेज व सौरभ चिटस फायनान्स व सौरभ पुस्तकालय यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांती निमित्त “हळदी कुंकू” कार्यक्रम हॉटेल ओमसाई येथे आयोजित करण्यात आला. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करुन सुरुवात करण्यात आले.

प्रास्ताविक सौ सुचिता गंदपवाड यांनी करताना “महिलांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य निरोगी असेल तरच कुटंब आनंदी राहते. व तसेच वाढते प्रदुषण पाहता पर्यावरण संवर्धनासाठी वडाचे रोपटे वाण रूपात देऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश जावा हाच एकमेव उदेश आहे.” असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ आरती पाटील (स्रीरोग तज्ञ)यांनी “महिलांना रजोनिवृत्तीनंतर विविध आजारांना सामोरे जावे लागते.पण रजोनिवृत्ती हि एक नैसर्गीक जैविक प्रकिया आहे.

या रजोनिवृत्ती ची सुरुवात साधारण वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षांत होते.यामुळे हाडांचे आजार,वजन वाढत,केस व त्वचेतील बदल, मानसिक अस्थैर्य,अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. याकाळात हार्मोन्सची पातळी बदलत असते.तरी अशा शारिरीक व मानसिक बदलला न घाबरता वयाच्या चाळीशी नंतर प्रत्येक स्त्रीने आपली गर्भाशयाचा कर्करोग निदानासाठी पँप स्मियर चाचणी आवश्य करावी ‌व योग्य आहार ,योग्य व्यायाम व सकारत्मक विचार यामुळे या अवस्थेतही निरोगी आंनददायी जीवन जगू शकता.”असे मत व्यक्त केले.

तर “भक्ती हि थोंताड नव्हे” यावर बोलताना ज.न.म.प्रवचनकार प्रवचन भुषण सौ सुनंदा श्रीरामे,”भारतीय संत महात्म्यांनी मानवी जीवन सुखी आनंददायी होण्यासाठी भक्तीचा मार्ग अवलंबला, जीवनातील दु:ख दुर होण्यासाठी भक्ती हा एकमेव उपाय आहे. आजच्या भोग विलासी अधुनिक काळात सर्व सुख सुविधा असताना ही प्रत्येक मनुष्य तनावात,दु:खात ,नैराश्यात का जातो? याचे चिंतन करताना लोभ, मत्सर या दुर्गुणमुळे अस्थिर होत आहे. तरी निस्सीम श्रद्धा भक्ती असेल तर जीवन आनंददायी होते.त्यामुळे भक्ती ही निस्वार्थ,निस्सीम असेल तर मानव रुपी जीवन समर्थ होते.”असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी विशेष प्रमुख उपस्थिती डाँ माधवी सुभेदार भोसले ,डाँ शारदाताई हिमगीरे,डाँ स्वप्नजा चांडोळकर,डाँ किरण ठाकरे,डाँ प्रतिक्षा काळे, डाँ स्मिता शेटवाड, डाँ सुप्रिया मारकवाड, डाँ प्रिया खंडागळे, डाँ स्नेहलता पाटील, नांदेड पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ जयश्री भरडे,पदोन्नत मुख्याध्यापक सौ प्रयाग बिचकुंदे, आर्ट आँफ लिव्हिंग च्या सौ विजया वावधाने, सौ पुष्पा बियाणी,सरपंच खरबखंडगाव सुलभाताई काळे, भाग्यलक्ष्मी बँक माजी संचालक आशाताई गरुडकर ,सौ अनुसया बंडे ,जेष्ठ शिक्षिका सौ सरस्वती मुपडे , सौ दैवशाला घाटे, सौ जयश्री उत्तकर, सौ सिंधुताई येवतीकर ,सौ सुनिता आल्लमले,सौ सुमन गुंडेवार ,स सौ प्रगती डांगे,सौ जयश्री बोंडलवार ,सौ वर्षा चालीकवार,सौ व्यंकुताई पच्चलींग,सौ मनिषा नरसीकर, सौ गंगाबाई जाधव, सौ संगिता पालदेवार सौ ललीता घोडके,मोहनावती संचालिका सौ पदमिन मेरगेवार सौ सुनिता गंदपवाड, सौ उर्मिला तोटकर, सौ रत्नमाला मस्कले ,सौ सुजाता कानवटे,सौ भाग्यश्री साधु, सौ रेखा तमशेटे,सौ सारिका निर्णे,सौ सारिका नागमवाड ,सौ अलका वाडीकर,सौ स्वाती गुणाले.सौ बबिता घेरे , यासह अनेक महिला भगिनींनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ शोभा तोटावाड तर आभार सौ संपदा गंदपवाड यांनी मानले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version