नांदेड। ज्ञानमाता विद्या विहार चा विद्यार्थी सार्थक अमोल शर्मा याने आठव्या वर्गातील नॅशनल सायन्स ओलंपियाड च्या ऑक्टोबर डिसेंबरमधील २०२३ च्या परीक्षेत शालेय स्तरावरून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे .
त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रमांक ५०४ असून विभागीय क्रमांक ३६८ तर झोनल क्रमांक २८५ असा आहे .येथील प्रसिद्ध कर सल्लागार अमोल शर्मा यांचा तो मुलगा आहे . आपल्या यशाचे श्रेय सार्थक हा शाळेचे प्रिन्सिपल अनिल जॉर्ज ,आपले वडील अमोल शर्मा ,आई सौ प्रेरणा शर्मा तसेच शिक्षीका दीपा अनिरुद्ध दांडगे आदींना देतो . सदर पुरस्काराबद्दल सार्थकचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .