नांदेड/हिमायतनगर। हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा उद्या दि.१७ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय सातवी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी पूर्ण तयारी झाली असून यंदाच्या धम्म परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायीका सुषमादेवी व गायक रविराज भद्रे यांचा बुद्ध-भिम गीतांचा जंगी सामना गत अनेक वर्षानंतर या भागात होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून सर्व स्तरातील समाजबांधवाचा सहभाग असलेल्या या धम्म परिषदेला जनतेने मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक त्रिरत्नकुमार भवरे,स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे,शेख रफिख,निमंत्रक कैलासराव माने पोटेकर, सुधाकर पाटील सोनारीकर यांनी केले आहे.
या एक दिवसीय धम्म परिषदेचे अध्यक्ष हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर तर,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यांत येणार आहे.या एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२३- २४ प्राप्त प्रा.विकास कदम, अभि.दयानंद शिंदे,विठ्ठल गायकवाड,विजय कटके, अमरदीप अचेमवार, गजानन सुर्यवंशी,अंगद खटाने, शिवाजी कांबळे,सोमा पाटील,मारोती चिभडे,एस.एन.मेटकर,समाधान सुर्वे, पि.पि.हनवते,शंकर गर्दसवार,संपादक शंकर सिंह ठाकूर आदी विविध क्षेत्रांत कर्तव्यतत्पर मान्यवरांना या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार,नांदेडच्या माजी महापौर शीलाताई किशोर भवरे, किनवट-माहूरचे आमदार भिमराव केराम,नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे,नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,माजी आमदार विजयभाऊ खडसे उमरखेड, लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर,माजी उपनगराध्यक्ष दलितमित्र किशोर भवरे, सिनेअभिनेता डॉ.प्रमोद अंबाळकर,डॉ.इरवंत पल्लेवाड, डाॅ.पि.बी.नामवाड,मिलिंद गायकवाड,शिवसेना नेते मंगेश कदम,साहित्यिक भिमराव कावळे,उत्तम कानिंदे आदीसह जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी व परिसरातील सामाजिक,राजकीय चळवळीत सक्रिय पदाधिकारी, लोकप्रतिनिधीसह मान्यवर या धम्म परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
बौद्ध धम्म परिषदेच्या पहिल्या सत्रात धम्म ध्वजारोहन करून परिषदेचे उदघाटन होईल, त्यानंतर पुज्यनिय भन्ते पय्यारत्न थेरो यांची धम्मदेसना तर,द्वितीय सत्रामध्ये प्रा.डॉ.जे. टी.जाधव यांचे व्याख्यान व दुपारी दोन वाजता बुद्ध- भीम गीतांचा व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून भिमशाहिर बाबूराव गाडेकर,बापूराव जमधाडे,नरेंद्र दोराटे,सविता गोदाम,शंकर गायकवाड,बुद्धिवंत आव्हाड आदी अनेक नामवंत शाहीर, कवी-गायक यामध्ये सहभाग असणार आहे.
त्यानंतर,विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांचा गौरव तर,सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायीका सूषमादेवी व सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे यांचा बुद्ध-भिम गितांचा जंगी सामना होणार आहे.सदर कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून संयोजक त्रिरत्नकुमार भवरे,डॉ. मनोज राऊत,लक्ष्मणराव मा.भवरे, संघपाल कांबळे,जयभिम पाटील,कानबा पोपूलवार, पांडुरंग मिरासे, शिवाजी डोकळे,शेख खय्युम,नागनाथ वच्चेवाड,परमेश्वर वालेगावकर, अविनाश कदम,संभाजी राऊत, पुण्यशील वाघमारे, बसवंत कांबळे,धम्मा वाढवे,नागोराव मेंडेवाड,सुभाष गुंडेकर,गंगाधर वाघमारे,केशव माने, जगन्नाथ नरवाडे, प्रताप लोकडे,गौतम राऊत,रामकुमार गुंडेकर,संजय गुंडेकर, सुर्यकांत खिराडे,किरण वाघमारे,यशवंत थोरात,विजय वाठोरे,संजय मुनेश्वर,राजू वाठोरे, सचिन कांबळे,शेषेराव पाटील,मनोज शिंदे,ज्ञानेश्वर पंदिलवाड, डॉ.कैलास कानिंदे, विश्वांभर वानोळे,गंगाधर गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
परिसरातील सर्व नागरिकांनी या एकदिवशीय धम्म परिषदेमधील सर्व सत्रांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक त्रिरत्नकुमार भवरे,स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे,शेख रफिख,निमंत्रक कैलासराव माने पोटेकर, सुधाकर पाटील सोनारीकर,जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, अनिल मादसवार, लक्ष्मणराव मा.भवरे आदींनी केले आहे.