
नवीन नांदेडl सिडको काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदी महेश दासराव शिंदे मांजरमकर यांच्यी नियुक्ती नाना गावंडे उपाध्यक्ष प्रशासन व संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई यांनी १ मार्च २४ रोजी दिले असून या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या शिफारशी वरून सदरील निवड करण्यात आली असून सिडको परिसरात व ग्रामीण भागात युवकांचा माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून ओकांर मित्र मंडळ अध्यक्ष या नात्याने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले असून काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहुन केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली.
सदरील निवडले पत्र नांदेड शहर काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शमीम अब्दुल्ला, नांदेड शहर बालक अध्यक्ष सुभाष राय बोले, शहर कार्यअध्यक्ष डॉ. दिनेश निखाते,शहर कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, सुभाष पाटील, माजी नगरसेवक रमेश गोडबोले, शेख अस्लम, अजिज कुरेशी व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या निवडीबद्दल डि. वाय. मिसाळ, विनोद सुरोसे,मयुर अमिलकंठवार, राम पाटील मोरे, ओकांर मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष विनोद जाधव, भास्कर शिंदे, व ओकांर मित्र मंडळ पदाधिकारी यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
