तुप्पा येथील मुर्ती स्थापना वर्धापन सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण,व किर्तनाचे आयोजन
नवीन नांदेड। श्री हनुमान मंदिर,संत ज्ञानेश्वरी संजिवनी समाधी सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह , ज्ञानेश्वरी पारायण, व श्रीहरी कीर्तन मौजे तुप्पा ता. जि. येथे ११ ते १८ डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
श्री हनुमान मंदिर तुप्पा येथे मुर्ती स्थापने चा ७ वा वर्धापनदिन सोहळा निमित्ताने प्रेरणास्थान वै. मामासाहेब मारतळेकर, ह.भ.प.आंनदबन गुरू गंभीरबन मंहत, शिभप सांब शिवाचार्य महाराज,वैदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज,हभप भाऊसाहेब महाराज, हभप विश्वनाथ महाराज ,हभप कै. माणिक महाराज, व प्रेरणास्थान किशन महाराज बरडेकर यांच्या आशिर्वादाने श्री संत ज्ञानेश्वरी संजिवनी समाधी सोहळ्या निमित्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री हरी कीर्तन मौजे सुप्पा ता. जि. नांदेड येथे दि. ११ डिसेंबर २०२३ रोज सोमवार ते दि. १८ डिसेंबर २०२३ रोज सोमवार पर्यंत संपन्न होत आहे.
दैनदिन कार्यक्रम या सोहळ्यात सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ३ तुकाराम चरित्र, ३ ते ६ भोजन, ६ ते ७ हरिपाठ आयोजित करण्यात आले असून दि. ११ डिसेंबर २३ रोज सोमवार ह. भ. प. श्री किशन महाराज बरबडेकर यांचे संजीवनी सोहळ्या निमित्त्य सकाळी ११ ते दु. १ गुलालाचे किर्तन तर १२ रोजी ह.भ.प.किशन महाराज बरबडेकर,तर ह.भ.प भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर,
१३ रोजी द.म.प. श्री आनंदबन महाराज तुप्पा, १४ ह.भ.प.श्री. बाबु महाराज कांकडीकर , १५ रोजी ह.भ.प. श्री विलास महाराज गजगे बोरीकर, दि.१६ रोजी ह.भ.प. श्री चंद्रकांत म. उस्माननगर , १७ रोजी ह.भ.प.आशिष म. काटे ,यांचे समांप्ती निमित्ताने हभप काटे महाराज यांच्ये काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार असून गावातील अन्नदाते यांनी सहकार्य केले आहे. या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावकरी मंडळी, तुप्पा ता. जि.नांदेड यांनी केले आहे.