नांदेड| नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक (जनरल) शशांक मिश्र ( भा.प्र.से ) यांचे आज नांदेड येथे आगमन झाले.

भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त वरिष्ठ सनदी अधिकारी शशांक मिश्र हे केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयात सहसचिव आहेत. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात ते थांबणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ९२०९१६३०२९ आहे. नागरिकांना काही तक्रारी असल्यास ते लोकसभा निवडणुकी संदर्भातील तक्रारी निवडणुकीसाठी आलेल्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांच्या लक्षात आणून देऊ शकतात.नागरिकांना भेटण्यासाठी त्यांनी सकाळी नऊ ते दहा ही वेळ ठेवली आहे.

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. नांदेडमध्ये दाखल
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या पोलीस निवडणूक निरीक्षक श्रीमती जयंती आर. यांचे आज नांदेड येथे आगमन झाले.

पोलीस निवडणूक निरीक्षक (पोलीस ऑब्झर्वर) श्रीमती जयंती आर. (भा.पो.से.) पोलीस विभागाकडून आलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्या तामीळनाडू कॅडरच्या २०१० च्या आयपीएस अधिकारी आहेत. तामीळनाडू येथे त्या पोलीस उप- महानिरिक्षक आहेत. शासकीय विश्रामगृहावर निवडणूक काळामध्ये त्या थांबणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ९४९८११११५५ असून नागरिकांना लोकसभा निवडणुकी संदर्भात असणाऱ्या समस्यांबाबत त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version