नांदेड। गोरगरिबांना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा या उद्देशाने काल दि.१५ रोजी हेलपिंग हँडस या सामाजिक संस्थेकडून गरीबांनध्ये अन्न वाटून दिवाळी साजरी केली आहे.
दिवाळी निम्मित १०० फूड पॅकेट्स यांचे वाटप करण्यात आले. या वेळेस संस्थेचे अध्यक्ष संकेत केंद्रे उपस्थित होते. या सामाजिक संस्थेला ४ वर्ष पूर्ण झालेली असून, ही संस्था सतत गरिबांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्यात यशस्वी ठरली आहे. इतकंच नसून या संस्थेने ४ वर्ष यशस्वी रित्या पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून गोर गरीबांनध्ये अन्न वाटून दिवाळीचा हा क्षण साजरा केला आहे.