नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव शहरा जवळ च असलेल्या पिंपळगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन 2012 ते 2022 अंतर्गत झालेल्या कामाची तात्काळ समिती नेमून चौकशी करण्यात यावे यासाठी दि. 7 नोव्हेंबर पासून पंचायत समिती समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. पिपळगाव येथे सन. 2012 ते 2022 या काळातील खालीलप्रमाणे चौकशी करण्यात यावी.

ग्रामपंचायत नमुना नं.08 ची चौकशी, ग्रामपंचायत ओपन स्पेस ची चौकशी, जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी 15 व्या वित्त आयोग सन 2016 ते सन 2022 पर्यंतच्या कामाची चौकशी, दलित वस्ती अंतर्गत झालेल्या कामाची सन 2012 ते 2022 पर्यंतच्या कामाची चौकशी करणे, घरपट्टी वसुली 2012 ते 2022 च्या घरपट्टी पावतीची चौकशी करणे शौचालय अनुदानाची चौकशी करणे, ग्रा. पं. अंतर्गत इतर निधी व जनरल खातेसंबंधीत झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या कडे करण्यात आले होते परंतु 6 नोव्हेंबर पर्यंत चौकशी झाली नसल्याने दि. 7 नोव्हेंबर पासून नायगाव पंचायत समिती समोर अमरण उपोषणाला रावसाहेब मैसाजी कदम, वैजनाथ लक्ष्मण लाडके यांनी बसले आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version