किनवट| गारपिटी व वादळी वाऱ्याच्या पावसाने किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कलपामधील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात गहू हरभरा तीळ या पिकांचे नुकसान झाले. अनेकांच्या फळबागा सुद्धा उद्ध्वस्त झाल्या होत्या. पण शासनाकडून नुकसान झालेल्या 50% शेतकऱ्यांनाच गारपिटीचा मोबदला मिळाला आणि उर्वरित 50 टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याने या शेतकऱ्यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 शुक्रवार रोजी नांदेड किनवट महामार्गावरील जलधरा या ठिकाणी रस्ता रोको केला आहे. एक तास हा रस्ता रोको आंदोलन झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

मार्च 2023 मध्ये झालेल्या गारपिटीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या काही शेजार्यांना मदतीपासून वंचित हेवण्यात आले आहे. यामुळे किनवट तालुक्यातील दिग्रस ,चंद्रपूर, थारा, जलधरा तांडा ,जलधरा ,डोंगरगाव ,परोटी , परोटी तांडा ,इरेगाव, माळकोल्हारी, सावरी, या भागातील शेतकऱ्यांनि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये जलधरा येथील महिला सरपंच वैशाली पाचपुते, प्रेमसिंग साबळे ,अजित साबळे, जव्हार चौफाडे, ज्ञानसिंग पंढारे, सवाईराम राठोड ,बापुराव झिंगरे, दसरथ चव्हाण, प्रकाश शिरडे ,तुकाराम बोरकर, यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व जवळपास 300 शेतकऱ्यांनी या रस्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

सदरील आंदोलन हे एक तास चालले महसूल प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्याचे हे रस्ता रोको आंदोलन सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी दाऊद खान व तलाठी अंकुश चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. व या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून त्यांना येत्या पंधरा दिवसात तलाठ्यांच्या माध्यमातून या भागातील गारपीटग्रस्त अनुदानापासून वंचित राहिलेल्या पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या अहवालाचा पंचनामा करून प्रशासनाला पाठवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version