हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील ग्रामीण रुग्णालयाचा पदभार वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ.विकास जाधव यांनी समभाळल्या पासून येथील रुग्णसेवेचा कार्यात वाढ झाली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना शासनाच्या मोफत उपचार सुविधा तत्परतेने मिळत आहे. आतातर येथील रुग्नालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दर बुधवारी होत असल्याने जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे, येथे ग्रामीण भागातून किनवट, उमरखेड, ढाणकी आणि हिमायतनगर तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या तेलंगणा राज्यातील कुबीर व तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंतचे रुग्ण उप[चारसाठी येत असतात. शहराच्या मध्यभागी असलेल्या ग्रामीण रुग्नालयाला आता नवे रूप येऊ लागले असून, जुन्या इमारतीवर दुसर मजला २० खाटाचा निर्माण झाला आहे. याचे काम अंतिम टप्यात आल्याने रुग्णांना आणखी अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दर बुधवारी होत आहे. काल दि.०९ गुरुवारी तालुक्यातील ९ जणांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या  रुग्णांसह नातेवाईकांना देखील या रुग्णालयात जेवण व शुद्ध पाणी यासह सर्व सुविधा मिळत असून, त्यामुळे रुग्नांमधून संधान मानले जात आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनाही दर बुधवारी येथील रुग्णालयात येऊन भरती व्हावे आणि गुरुवारी त्यांच्या शस्त्रक्रिया केली जाईल असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.विकास जाधव यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version