अर्धापूर| तालुक्यातील लहानचे भूमीपुत्र माजी सैनिक राजपाल मारोतीराव लोणे यांच्या पार्थिवावर बुधवारी लहान येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात जड अंतःकरणाने अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी दहा वर्षाचा त्यांचा मुलगा आश्वद राजपाल लोणे यांनी दिला चित्तेला आग्नी दिला. माजी सैनिक राजपाल लोणे(वय ४३ वर्षे) यांचे मंगळवारी सायंकाळी अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी लहान येथे गावकरी व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी त्यांना शेवटचा निरोप दिला.

यावेळी पूज्य भदंत पय्याबोध्दी, मुदखेड सेंटरचे ट्रेनिंग अधिकारी लोहित अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, महसूल प्रशासनाचे प्रतिनिधी नवीन रेड्डी, अर्धापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी दिपक मस्के,माजी सभापती अशोक सावंत,माजी सरपंच बालासाहेब देशमुख, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ यु.एम.इंगळे,सरपंच सदाशिव इंगळे, उपसरपंच शेख महेबुब, सेवानिवृत्त सैनिक व पॅरामिल्ट्री फोर्स संघटनेचे अध्यक्ष सुनील लोणे,व आजी माजी पदाधिकारी पँरामिलीट्री संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष सुनील लोणे,तालुका अध्यक्ष गोविंद माटे, हेड कॉन्स्टेबल विलास पवार, पवन शरद,मुरलीधर राणा कृष्णा तुप्पे, माजी सैनिक माधव माटे, चंद्रकांत लाडके,ज्ञानेश्वर जोगदंड, माधव कदम, सयाजी तेलंगे, शेख खय्यूम,बालाजी दवणे,माजी सैनिक माधव कदम,शंकर राक्षसे,यु.एम.केंद्रे,माजी सैनिक सुरेश जोंधळे,राजकुमार पैठने, दीनानाथ पांचाळ,रोहिदास आडे संग्राम जायभाये,संजय गायकवाड,शंकर कदम,माधव कदम,पिराजी मामडे,आर.एस. पोचीराम,डी.बी.लंगोटे,मदन पापलवाड,बालाजी लांडगे, सखाराम गलगे आदी आजी माजी पदाधिकारी यांनी नी पुष्प अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.  

यावेळी साश्रुनयनांनी दिला शेवटचा निरोप; आई ठरली शेवटची भेट

राजपाल लोणे हे केन्द्रिय राखीव दलाचे माजी सैनिक सैनिक होते ते नुकतेच सेवानिवृत्त झाले व ते नांदेड येथे वास्तव्यास होते.मंगळवारी आईची भेट घेण्यासाठी व सेवानिवृत्तीनंतर शिक्षण घेतलेल्या जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गावी आले आईची भेट घेतली व शाळेत सत्कार स्वीकारला आणी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून नांदेडला लहान -बारड – भोकरफाटा मार्ग नांदेड जातांना बारड जवळच्या आंबेगाव पाटी जवळील लहान मार्गावर असलेल्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जख्मी झाले त्यांना मृत्यूंजय दुत बाळासाहेब देशमुख यांनी तातडीने पुढील उपचारासाठी नांदेड हलवले.डॉ शंकरराव चव्हाण रुग्णालयात दाखल केल तपासणी केली असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यांच्या अपघाती व अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली असून सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.दिवंगत राजपाल लोणे यांच्या पश्चात एक मुलगी,एक मुलगा,आई,दोन मोठे भाऊ असा परिवार आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version